Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

By नवनाथ कराडे | Published: December 10, 2018 03:21 PM2018-12-10T15:21:15+5:302018-12-10T15:21:51+5:30

नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ...

Ahmednagar Municipal Election: Will the mayor of the post office again play? | Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

नवनाथ खराडे
अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगरला महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही परंपरा कायमच आहे. नगरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.
२००३ मध्ये स्थापन झालेल्या नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे कल हाती येत आहेत. ३० जून २००३ रोजी नगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. या निवडणकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. यावेळी संदीप कोतकर महापौर बनले. २००८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही शिवसेना- भाजप युती बहुमताच्या जवळ पोचली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला १८, भाजपला १२, काँग्रेसला ९, राष्ट्रवादी १४, मनसे २ तर अपक्ष २ व इतरांना दोन जागा मिळाल्या. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर झाले. मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. शिला शिंदे या महापौर झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या तिसºया सार्वत्रिक निवडणुकीत युती व काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. शिवसेनेला १७, भाजपा ९, काँग्रेस ११ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या. मनसे ४, अपक्ष ९ अशा जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून पुन्हा एकदा संग्राम जगताप महापौर झाले. त्यानंतर काही काळातच विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी विजय मिळविला ्त्यामुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. पण दुसºया टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. आणि सुरेखा कदम महापौर बनल्या.
मागील १५ वर्षांत ७ महापौर झाले असून, त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषविता आलेले नाही. आता पार पडलेल्या निवडणुकीतही कोणत्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणुक स्वतंत्र लढविली होती. शहरातील अंतर्गत चौथ्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचा महापौर होण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत.
या घोडेबाजारमध्ये नेमका कोणता पक्ष आघाडी घेतोय याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.

Web Title: Ahmednagar Municipal Election: Will the mayor of the post office again play?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.