पारनेरमध्ये दारुबंदीसाठी एल्गार

By admin | Published: August 24, 2016 12:20 AM2016-08-24T00:20:17+5:302016-08-24T00:46:25+5:30

पारनेर : निघोज, जवळे, ढवळपुरी येथे दारूबंदीसाठी लढा दिल्यानंतर आता पारनेर तालुक्यात दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्धार राळेगणसिध्दी येथे पारनेर तालुका दारूबंदी कार्यकर्ते

Algarr for alcohol prohibition in Parner | पारनेरमध्ये दारुबंदीसाठी एल्गार

पारनेरमध्ये दारुबंदीसाठी एल्गार

Next


पारनेर : निघोज, जवळे, ढवळपुरी येथे दारूबंदीसाठी लढा दिल्यानंतर आता पारनेर तालुक्यात दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्धार राळेगणसिध्दी येथे पारनेर तालुका दारूबंदी कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावात दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.
निघोज, जवळे,ढवळपुरी परिसरात महिला व पुरूषांनी मिळून एकत्रित चांगला लढा दिल्याने आता पारनेर तालुक्यात दारूबंदीचे वारे वाहू लागले आहे.
दारूबंदी चळवळीचे प्रमुख बबन कवाद, रामदास घावटे, डॉ.महेंद्र झावरे यांच्या पुढाकाराने आता गावागावात दारूबंदीसाठी चळवळी सुरू झाल्या आहेत. दारूबंदी करताना आधी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा, मासिकसभेत दारूबंदीचे ठराव घेण्याचे निश्चित करण्यात आले.
राळेगणसिध्दीच्या बैठकीत बोलताना बबन कवाद म्हणाले, निघोज दारूबंदीचा लढा देताना अनेक अडचणी आल्या. त्याला आपण सर्वजण धैर्याने सामोरे गेलो, महिला व ग्रामस्थांनी साथ दिल्याने निघोज दारूबंदी यशस्वी झाली.
जवळे येथील दारूबंदी चळवळीचे प्रमुख रामदास घावटे म्हणाले, दारूबंदी करताना प्रत्येक गावात आपले शत्रू तयार होत असल्याने आमच्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, परंतु समाजाची पिढी वाचविण्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे.
यावेळी दारूबंदी समितीच्या महिला कार्यकर्त्या कांता लंके, पूजा रसाळ, रंजना पठारे, वैशाली भालेराव आदींनी दारूबंदी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.
यावेळी हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड.रंजना गवांदे यांनीही दारूबंदी चळवळीची माहिती दिली.
(तालुका प्रतिनिधी)
निघोजमधील दारूबंदीने राज्यात नवा इतिहास रचला आहे. आपण आता राज्यात दारूबंदीसाठी जनजागृती करणार असून दारू विकेत्यांवर कारवाई होण्यासाठी महिलांचे ग्रामसुरक्षा दल उभारून त्यांना काही अधिकार देण्याची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री व मंत्री सकारात्मक असून लवकरच याचा मसुदा तयार होत आहे. आता कार्यकर्त्यांनी जनजागृती करून दारूबंदी प्रत्येक गावात होण्यासाठी प्रयत्न करावे, असे ंआवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

Web Title: Algarr for alcohol prohibition in Parner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.