गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी, भाचीवर काळाचा घाला; नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! 

By रोहित टेके | Published: October 26, 2022 05:06 PM2022-10-26T17:06:25+5:302022-10-26T17:06:46+5:30

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगावातील घटना : कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या नदीवर

aunt and niece who went to the dock to wash clothes unfortunate death by drowning in the river | गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी, भाचीवर काळाचा घाला; नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! 

गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी, भाचीवर काळाचा घाला; नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी व भाचीवर काळाने घाला घालत गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरीकाठी बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घडली आहे. या ऐन भावबीजेच्या दिवशी घडलेल्या  दुर्दैवी घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

अर्चना जगदीश सोनवणे (वय ३५, रा. नाशिक), गौरी शरद शिंदे (वय १८, रा. मसरुल नाशिक) असे मृत झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्चना जगदीश सोनवणे व गौरी शरद शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मामा मंगेश चव्हाण यांच्या गावी आल्या होत्या. आज सकाळी गोदावरी नदीला पाणी असल्याने नदीकाठी काही महिला व एक मुलगा कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी मावशी व भाचीचा पाय घसरून त्या नदी पात्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन महिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडणार असल्याचे समजल्यावर जवळच असलेल्या एका मुलाने पाण्यात उडी मारून तिघा महिलांना वाचवले. मात्र, या दोघींना वाचवण्यात त्याला अपयश आले. 

घटनेची माहिती वाऱ्यासारखी कान्हेगाव परिसरात पसरली, यावेळी अनेक जण नदीकाठी पोहोचले, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचून पंचनामा केला असून घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: aunt and niece who went to the dock to wash clothes unfortunate death by drowning in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.