लोकसहभागातून अमरधाम बनतेय ‘स्वर्गद्वार’

By admin | Published: March 20, 2016 12:40 AM2016-03-20T00:40:12+5:302016-03-20T00:48:02+5:30

अण्णा नवथर, अहमदनगर लोकसहभागातून प्रश्न सहज कसे सुटू शकतात, ते दाखवून दिले आहे ते येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी़

'Awad Dasar' is made from people's participation | लोकसहभागातून अमरधाम बनतेय ‘स्वर्गद्वार’

लोकसहभागातून अमरधाम बनतेय ‘स्वर्गद्वार’

Next

अण्णा नवथर, अहमदनगर
अमरधामधील दुरवस्थेबाबत तक्रारी अनेकजण करतात़ मात्र, कुठेही तक्रार न करता लोकसहभागातून प्रश्न सहज कसे सुटू शकतात, ते दाखवून दिले आहे ते येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी़ सुविधांसाठी पैसे नको, सुविधा द्या, अशी हाक त्यांनी दिली़ अवघ्या दोन महिन्यांत पन्नास फूट लांबीचे शेड, दशक्रियाविधीसाठी दोन चौथरे, एक बोरअवेल, पाण्याचा हौद, पेव्हेर आणि रोप यांसारख्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ लोकसहभागातून अमरधाम खरेखुरे एक स्वर्गद्वार बनेल यात शंका नाही, अशीअपेक्षा या पदाधिकाऱ्यांना आहे़
अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी शहरासह इतर ठिकाणचेही लोक जमतात़ पण, तुटपुंज्या सुविधांमुळे नातेवाईकांची तारांबळ होते़ ती होऊ नये, असे प्रत्येकाला वाटते़ ही गरज लक्षात घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे यांच्यासह सुधाकर बोरुडे, मोहन बेरड, प्रशांत अनमल, दीपक पवार यांनी २९ जानेवारी रोजी कामाला सुरुवात केली़ स्वच्छता केली़ स्वच्छतेनंतर इथे काय करता येईल, यावर त्यांनी चर्चा केली़ दशक्रिया विधीला जागा कमी पडते, असे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यासाठी दोन चौथरे बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला़
निर्णय झाला आणि ते बांधून देण्यास दिल्ली गेटपरिसरातील औषधालय चालक तयार झाले़ त्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली़ नातेवाईकांना बसण्यासाठी शेड हवे आहे़ एकाने शेड बांधण्यासाठी पैसे देऊ केले, पण ते त्यांनी घेतले नाही़ मग शेडच त्या व्यक्तीने बांधून द्यावे, असे ठरले़ पाणी आणणार कुठून, असाही प्रश्न समोर आला़ त्यासाठी बोअर घेऊन देण्याची जबाबदारी सुरेश मॅना यांनी उचलली़ भिंतींना रंग अनमल यांनी स्वखर्चातून दिला़ भिंतीही चकाचक झाल्या़ शौचालये एकाने बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: 'Awad Dasar' is made from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.