अर्बन बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान

By admin | Published: April 24, 2016 11:07 PM2016-04-24T23:07:42+5:302016-04-24T23:12:36+5:30

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार व गौरव प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

Best Bank Award for Urban Banks | अर्बन बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान

अर्बन बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान

Next

अहमदनगर : महाराष्ट्र अर्बन को-आॅप. बँक्स असोसिएशनच्यावतीने येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार व गौरव प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आ. प्रशांत परिचारिक, बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, बँकेचे संचालक अनिल कोठारी, अजय बोरा आदि उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थापनेनंतर शतकोत्तर वाटचाल करताना सहकाराच्या जुन्या संस्काराची कास धरुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत अर्बन बँकेने सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, बँकींग व्यवहार करणारे हितचिंतक व त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची विश्वासार्हता जपत प्रगती केली आहे़
बँकेच्या या कामाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला़ पुरस्कार देताना सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्बन बँकेबद्दल गौरवोद्गार काढले.

Web Title: Best Bank Award for Urban Banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.