मराठा आरक्षण प्रश्नी साखळी उपोषण; श्रीरामपूर तालुक्यात नेत्यांना प्रवेश बंदी

By शिवाजी पवार | Published: October 28, 2023 02:25 PM2023-10-28T14:25:46+5:302023-10-28T14:26:11+5:30

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत.

Chain hunger strike over Maratha reservation question; Entry ban for leaders in Srirampur taluka | मराठा आरक्षण प्रश्नी साखळी उपोषण; श्रीरामपूर तालुक्यात नेत्यांना प्रवेश बंदी

मराठा आरक्षण प्रश्नी साखळी उपोषण; श्रीरामपूर तालुक्यात नेत्यांना प्रवेश बंदी

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (अहमदनगर) : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत. याशिवाय तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यातील निमगाव खैरी, माळेवाडी येथे शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू करण्यात आले. शहरातील तहसील कार्यालयासमोरही मराठा समाजाच्या संघटनांचे साखळी उपोषण सुरू आहे. श्रीरामपूर नेवासे रस्त्यावर येणाऱ्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत. यात वडाळा महादेव, भोकर, खोकर, टाकळीभान, खंडाळा या गावांचा समावेश आहे. उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Chain hunger strike over Maratha reservation question; Entry ban for leaders in Srirampur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.