चांदेकसारे परिसरात ढगफुटी; आनंदवाडी, दयानंदवाडी पाण्याखाली, नागरिकांनी घरावर बसून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 11:13 AM2022-10-20T11:13:39+5:302022-10-20T11:14:35+5:30

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात सोनेवाडी नागरवाडी अदी ठिकाणी अतिवृष्टी झाली ही अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील ओढे नाले ओव्हर फ्लौ वाहु लागले.

Cloudburst in Chandeksare area; Anandwadi, Dayanandwadi under water, citizens spent the night sitting at home | चांदेकसारे परिसरात ढगफुटी; आनंदवाडी, दयानंदवाडी पाण्याखाली, नागरिकांनी घरावर बसून काढली रात्र

चांदेकसारे परिसरात ढगफुटी; आनंदवाडी, दयानंदवाडी पाण्याखाली, नागरिकांनी घरावर बसून काढली रात्र

Next

शिवाजी जाधव
चांदेकसारे  (जि. अहमदनगर ):  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात बुधवारी रात्री ढगफुटी झाली. पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आनंदवाडी व दयानंदवाडी या परिसरात असलेले 250 कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण परिसर पाण्यात बुडाला आहे. नागरिकांनी रात्र घराच्या छतावर बसून काढली आहे. घरासमोर बांधलेले जनावरे व इतर गोष्टीचा अंदाज बचाव कार्यपथक आल्यानंतरच उघड होईल असे दिसते.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात सोनेवाडी नागरवाडी अदी ठिकाणी अतिवृष्टी झाली ही अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील ओढे नाले ओव्हर फ्लौ वाहु लागले. देव नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला. आणि बघता बघता रात्रीच आनंदवाडी व दयानंदवाडी ही पाण्याखाली गेली. स्थानिक नागरिक केशवराव होन, सुधाकर होन, विलास चव्हाण, संजयलाला होन, दादासाहेब होन, सचिन होन, दिलिप होन अदीसह परिसरातील नागरिकांना ही परिस्थिती समजतात पहाटेच त्यांनी मदतीसाठी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांना माहिती दिली.

आमदाल आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनाही ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती देत बचाव कार्य पथकांची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार विजय बोरुडे यांनी पहाटेच बचाव कार्यपथक पाचारण केले आहे. पुरात अडकलेल्या या नागरिकांची सुटका करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी देखील आनंदवाडी दयानंदवाडी या परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला होता. 

अडीचशे ते तीनशे कुटुंब पाण्याखाली गेली होते. या परिसरात आदिवासी बांधवांची संख्या जास्त आहे. हातावर पोट असल्याने हा फटका त्यांना खूप मोठे संकट देऊन जाणारा आहे. या पुरामध्ये या परिसरातील नागरिकांच्या सर्व संसार वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे. मागच्या पुरामध्ये नाशिक शिर्डी हायवे च्या दोन्ही ओढ्यावर छोटे पूल असल्यामुळे पूर परिस्थिती ओढवली होती मात्र आता तर या ओढ्यावरील पुलांची उंची वाढली असतानाही पुन्हा आनंदवाडी दयानंदवाडी  पाण्याखाली गेली आहे. प्रशासनाकडून मदत कार्य व बचाव कार्य सुरू असून लवकरच नुसकनीचा आणणारा समोरील येईल.
 

Web Title: Cloudburst in Chandeksare area; Anandwadi, Dayanandwadi under water, citizens spent the night sitting at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.