अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडणार

By admin | Published: August 11, 2016 01:07 AM2016-08-11T01:07:51+5:302016-08-11T01:11:37+5:30

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत केल्या़

To destroy unauthorized 52 religious places | अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडणार

अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडणार

Next

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत केल्या़ जिल्ह्यातील एक हजार ९३२ धार्मिक स्थळे नियमित करण्याचेही यावेळी ठरले़
जिल्हा नियोजन भवनात प्रभारी जिल्हाधिकारी पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, महापालिका आयुक्त दिलीप गावडे, नगरपालिका प्रशासनाचे नितीन कापडणीस, नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि सर्व तालुक्यांचे तहसीलदार बैठकीस उपस्थित होते़
अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरीत करण्याबाबचे न्यायालयाचे आदेश आहेत़ न्यायालयाने त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांचा अहवाल तयार केला आहे़ या अहवालावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली़ महापालिका व नगरपालिका प्रशासनाकडून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांची माहिती देण्यात आली़ त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील १ हजार धार्मिक स्थळे नियमित करण्यास समितीने मंजुरी दिली़ मात्र सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे़
निष्कासित करण्यात येणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या ५२ असून, ते पाडण्यात येणार आहेत़ तशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या असून, धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: To destroy unauthorized 52 religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.