गुरूपोर्णिमेनिमित्त देवगडला भाविकांची मांदीयाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:15 PM2018-07-27T14:15:40+5:302018-07-27T14:15:48+5:30

तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

Devadas for devotees of the temple | गुरूपोर्णिमेनिमित्त देवगडला भाविकांची मांदीयाळी

गुरूपोर्णिमेनिमित्त देवगडला भाविकांची मांदीयाळी

googlenewsNext

नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
गुरुपोर्णिमेनिमित्त श्री गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेद मंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगाचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले.
सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Web Title: Devadas for devotees of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.