...तर विखेंनाही मंत्रिपद मिळेल!

By admin | Published: August 24, 2016 12:17 AM2016-08-24T00:17:47+5:302016-08-24T00:45:10+5:30

सात्रळ : राजकारणात काहीही घडते, नजिकच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल,

... do not even see a ministerial office! | ...तर विखेंनाही मंत्रिपद मिळेल!

...तर विखेंनाही मंत्रिपद मिळेल!

Next


सात्रळ : राजकारणात काहीही घडते, नजिकच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल, असे सूतोवाच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी जाहीर सभेत केले़ त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या़
सात्रळ परिसरात सोमवारी विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार कर्डिले यांच्या हस्ते झाला़ अध्यक्षस्थानी प्रगती ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष विजय कडू होते़ राजकारणात काळानुसार बदल होतो़ जे बदलत नाहीत त्यांची दुकानदारी बंद होते, अशी टीका माजी आ़ प्रसाद तनपुरे यांच्यावर केली़
निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली़ निळवंडेमुळे जिरायती भागाला दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले़ तनपुरे कारखाना चालू झाला पाहिजे, त्यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ विठ्ठलराव कडू, बाळकृष्ण चोरमुंगे, नारायण धनवट यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, मंदाताई डुके्र, वैशाली नान्नोर आदी उपस्थित होते़ सुत्रसंचालन अशोक भुसारी यांनी केले़ आभार मंगेश कडलग यांनी मानले़ (वार्ताहर)

Web Title: ... do not even see a ministerial office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.