दुचाकी अपघातात डॉक्टराचा मृत्यू

By admin | Published: August 8, 2016 12:05 AM2016-08-08T00:05:16+5:302016-08-08T00:10:24+5:30

अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर टोलनाक्याजवळ दुचाकी अपघातात येथील डॉ़ संतोष रत्नाकर थोलार (वय ६५) यांचा मृत्यू झाला़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़

Doctor's death in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात डॉक्टराचा मृत्यू

दुचाकी अपघातात डॉक्टराचा मृत्यू

Next

अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर टोलनाक्याजवळ दुचाकी अपघातात येथील डॉ़ संतोष रत्नाकर थोलार (वय ६५) यांचा मृत्यू झाला़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़
थोलार हे सकाळी आपल्या दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या दुचाकीला यांच्या दुचाकीचा धक्का लागला़ दुचाकीचा वेग जास्त असल्याने दुचाकीवरून जाणारे दोघे रस्त्यावर पडले तर थोलार हे लांबवर फरफटत जाऊन खाली पडले़ या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला़ घटनेनंतर त्यांना तातडीने येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरून जाणारे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत़

Web Title: Doctor's death in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.