दरोडेखोर शंभू भोसले गजाआड

By admin | Published: July 14, 2016 01:21 AM2016-07-14T01:21:22+5:302016-07-14T01:27:17+5:30

अहमदनगर : दरोड्यासह विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला शंभू कुंज्या भोसले याला बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून नगर शहरातील नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़

Draudkhor Shambhu Bhosale Gajaad | दरोडेखोर शंभू भोसले गजाआड

दरोडेखोर शंभू भोसले गजाआड

Next

अहमदनगर : दरोड्यासह विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला शंभू कुंज्या भोसले याला बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून नगर शहरातील नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़ पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली़
श्रीगोंदा तालुक्यातील फरार आरोपी शंभू भोसले नालेगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, पोलीस हेडकॉस्टेबल योगेश सोनवणे, पोलीस नाईक दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, भगिनाथ पंचमुखी, विनोद मासलकर, सचिन कोळेकर यांनी आरोपीला नालेगाव परिसरात ताब्यात घेतले़ बेलवंडी पोलिसांना दरोडा आणि फसवणूक गुन्ह्यात भोसले हवा होता़
(प्रतिनिधी)

Web Title: Draudkhor Shambhu Bhosale Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.