श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 05:26 PM2017-12-03T17:26:54+5:302017-12-04T11:41:24+5:30

मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली 

 Due to the darshan of Lord Dattatreya in Shri Sector Devgarh | श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गर्दी

श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गर्दी

googlenewsNext

नेवासा : मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली 
    वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे ३.३०वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी भगवान श्री गुरू दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करून अभिषेक घातला त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले सकाळी ६ वाजता महाआरती बरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली व पाच दिवस चालणाऱ्या दत्तयागाची सांगता ही यावेळी करण्यात आली.
      नगर जिल्ह्यासह मराठवाडा व राज्यातील भाविक सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी करत असून दुपारी तीन वाजेनंतर श्री दत्तजन्म सोहळ्यास सुरवात होऊन सायंकाळी ६ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार असून यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सह धार्मिक ,राजकीय  क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे.
     वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक,होमगार्ड पथक,तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक ही संस्थानच्या वतीने तैनात करण्यात आले आहे.
नेवासा,नगर,श्रीरामपुर गंगापुर या आगरातून भाविकांसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली  आहे

Web Title:  Due to the darshan of Lord Dattatreya in Shri Sector Devgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.