डमी बसविणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा

By admin | Published: August 10, 2016 12:03 AM2016-08-10T00:03:06+5:302016-08-10T00:26:33+5:30

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या तलाठीपदाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी अनुरुध्द गव्हाणे

Dummy Law | डमी बसविणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा

डमी बसविणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा

Next


अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या तलाठीपदाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी अनुरुध्द गव्हाणे याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनुरुध्द गव्हाणे याचा भाऊ गणेश गव्हाणे यानेच परीक्षा दिल्याचे तपासात उघड झाले आहे़
जिल्हाप्रशासनाने तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ सप्टेंबर २०१५ मध्ये शहरातील विविध उपकेंद्रांवर लेखी परीक्षा घेतली़ सदर लेखी परीक्षेस खुल्या प्रवर्गातून आष्टी तालुक्यातील कारखेल येथील अनुरुध्द रामराव गव्हाणे याची तलाठी पदासाठी निवड करण्यात आली होती़ मात्र गव्हाणे याच्या निवडीबाबत प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली़ या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अनुरुध्द गव्हाणे यांचे कागदपत्रे तपासली़ तपासादरम्यान त्याचा भाऊ गणेश याचे छायाचित्र आॅनलाईन अर्जावर अपलोड केल्याचे निदर्शनास आले़ तलाठी पदाची परीक्षा गव्हाणे यानेच दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला़ तलाठी अनुरुध्द याचा भाऊ गणेश येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात बी़ एस़ सी़ च्या तृतीय वर्षात शिकतो़ तसेच गणेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्याचा त्याला या परीक्षेला फायदा झाला़ परीक्षेत अनुरुध्द उत्तीर्ण झाला़ त्याची प्रशासनाने तलाठी पदासाठी निवडदेखील केली़ या घटनेला एक वर्षे उलटले़ एक वर्षे उलटल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून अनुरुध्द विरोधात गुन्हा दाखल केला़ परीक्षेत डमी उमेदवार बसवून शासनाची फसवणूक केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे़ डमी उमेदवार बसविल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ परीक्षेच्या वेळी त्याचे ओळखपत्र तपासले होते का आणि तपासले असेल तर ही बाब संबंधिताच्या निदर्शनास का आली नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ चौकशीतून अनुरुध्द याचे पितळ उघडे पडले असून, याप्रकरणी तहसीलदार हेमा बडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Dummy Law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.