माजी पोलीस निरीक्षक ढोकले यांचा येरवडा कारागृहात मृत्यू

By admin | Published: August 12, 2016 11:53 PM2016-08-12T23:53:43+5:302016-08-12T23:56:51+5:30

पुणे/अहमदनगर :नितीन साठे याच्या पोलीस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Ex-police inspector Dhokle dies in Yerawada Jail | माजी पोलीस निरीक्षक ढोकले यांचा येरवडा कारागृहात मृत्यू

माजी पोलीस निरीक्षक ढोकले यांचा येरवडा कारागृहात मृत्यू

Next

पुणे/अहमदनगर : नगर जिल्ह्णातील नितीन साठे याच्या पोलीस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर येरवडा कारागृह रुग्णालयात उपचार सुरु होते.
कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकले मार्च महिन्यापासून येरवडा कारागृहात होते. नगर कारागृहामधून त्यांना येरवडा कारागृहात वर्ग करुन घेण्यात आले होते. दलित तरुण नितीन साठे याचा पोलीस कोठडीदरम्यान ढोकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन ढोकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ढोकले यांनी नगर जिल्ह्णातील कर्जत, पारनेर आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना नितीन साठे याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता.
ढोकले यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यावर ते पुन्हा कारागृहात परतले होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. येरवडा कारागृह रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एस. देशपांडे यांनी तातडीने ढोकले यांना आॅक्सिजन पुरवण्याचा तसेच अन्य उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ढोकले यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांना योग्य उपचार दिले गेले नाहीत. एवढी वर्ष पोलीस दलासाठी काम केलेल्या व्यक्तीला गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात येत होती. कोणाच्या तरी दबावाखातर त्यांना उपचार देण्यात आले नाहीत. त्यांनी अनेकदा विनंतीही केलेली होती. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.’’
- नारायण कामठे,
ढोकले यांचे व्याही

Web Title: Ex-police inspector Dhokle dies in Yerawada Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.