पाच दरोडेखोरांना अटक

By admin | Published: March 19, 2016 12:04 AM2016-03-19T00:04:34+5:302016-03-19T00:10:32+5:30

जामखेड : नगर -जामखेड मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या पाच दरोडेखोरांना जीपसह जामखेड पोलिसांच्या पथकाने पकडले.

Five robbers arrested | पाच दरोडेखोरांना अटक

पाच दरोडेखोरांना अटक

Next

जामखेड : नगर -जामखेड मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या पाच दरोडेखोरांना जीपसह जामखेड पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे, रोख ४७ हजार रुपये, जीप असा एकूण दोन लाख, ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यामधील एक दरोडेखोर मोक्का गुन्ह्यातील आहे.
जामखेड पोलिसांचे पथक कर्जत फाटा येथे पहाटे अडीचच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना हे दरोडेखोर जीपमधून (एम. एच. २५, आर. ३१३९) वेगाने नगरच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यामुळे पोलीस पथकाचा संशय बळावला. पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक उजागरे, पो. कॉ. संदीप तागड, तुकाराम देवकाते, गणेश गाडे, गणेश साने, हे. कॉ. भाऊसाहेब गडाख, बापू गव्हाणे यांच्या पथकाने या जीपचा १ कि. मी. अंतरापर्यंत पाठलाग करून नगर -जामखेड मार्गावरील एका हॉटेलसमोर ही जीप अडविली.
जीपची तपासणी केली असता लोखंडी करवत, स्क्रू ड्रायव्हर, तलवार, नायलॉनची दोरी, मिरची पूड व रोख ४७ हजार रुपये आढळून आले, ते पोलिसांनी जप्त केले व रामदास बापू पवार (वय ५२), प्रभू शिवाजी शिंदे (वय २१, दोघे रा. वाशी, जिल्हा उस्मानाबाद), शहाजी उत्तम काळे (वय ४९), सोनाजी शहाजी काळे (वय १९, दोघे रा. पारडी, जिल्हा उस्मानाबाद), राजेंद्र गुलाब काळे (वय २४, रा. कासारखाणी, ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) या पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतले. यांपैकी राजेंद्र गुलाब काळे (वय २४) हा मोक्का गुन्ह्यातील आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश साने यांच्या फिर्यादीवरुन या पाच जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आर. जे. इंगळे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पाच जणांची ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. परंतु पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. व त्यांच्याकडून हत्यारे व इतर ऐवज जप्त केला. या टोळीला अटक केल्यामुळे जामखेड तालुक्यात आतापर्यंत पडलेल्या दरोड्यांवर प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Five robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.