पंधरवड्यात ५६ कोरोनामुक्त नागरिक परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:54+5:302021-05-20T04:21:54+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील विलगीकरण कक्षात साधारणपणे पहिल्याच पंधरवड्यात ५६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी ...

In a fortnight, 56 coroner-free citizens returned home | पंधरवड्यात ५६ कोरोनामुक्त नागरिक परतले घरी

पंधरवड्यात ५६ कोरोनामुक्त नागरिक परतले घरी

Next

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील विलगीकरण कक्षात साधारणपणे पहिल्याच पंधरवड्यात ५६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती सरपंच मनीषा रोकडे व उपसरपंच सागर मैड यांनी दिली.

सुपा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माऊली एज्युकेशन ट्रस्टच्या शैक्षणिक संकुल असणाऱ्या इमारतीत लोकसहभागातून विलगीकरण कक्ष १ मे पासून सुरू आहे. गावातील वाढती रुग्ण संख्या पाहता सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीचा ग्रामपंचायत प्रशासनाने सकारात्मक विचार करून १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून माऊली शिक्षण संस्थेच्या निसर्गरम्य वातावरणातील डोंगरावरील शुद्ध व स्वच्छ हवेचा भरपूर पुरवठा असणाऱ्या ठिकाणी हे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे उद्योजक शरद पवार यांनी सांगितले. विलगीकरण कक्ष सुरू करण्यापासून आतापर्यंत १११ रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. त्यापैकी सध्या ५५ रुग्ण उपचार घेत असून ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, असे कोरोना ग्रामरक्षक समितीचे सचिव व ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे यांनी सांगितले.

आरोग्यधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ म्हणाल्या, आमच्या आरोग्यविभागाचे आरोग्य सेवक व आरोग्यसेविका नियमितपणे भेट देऊन उपचार करीत असून गावातील खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर नियोजनानुसार येथे भेट देऊन रुग्णांवर उपचार करीत आहेत.

तहसीलदार ज्योती देवरे, माजी सभापती दीपक पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, उद्योजक योगेश रोकडे, शरद पवार, सचिन काळे, बाजार समितीचे संचालक विजय पवार, ग्रामविस्ताराधिकारी अशोक नागवडे आदींच्या उपस्थितीत बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले.

===

ग्रामस्थांसह दानशुरांची मदत..

ग्रामस्थ, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक व दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून या कक्षासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वस्तू रूपाने मिळणाऱ्या सहाय्यामुळे सर्वांना सकाळी चहा, नाश्ता व सकस भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पंचायत समिती सदस्य दीपक पवार, माजी सरपंच विजय पवार, सचिन काळे यांनी सांगितले.

===

----

१९ सुपा कोरोना

सुपा येथील विलगीकरण कक्षातून उपचारानंतर बरे होऊन घरी निघालेल्या नागरिकांना शुभेच्छा देताना तहसीलदार ज्योती देवरे, आरोग्यधिकारी डॉ. प्रकाश लाळगे व इतर.

Web Title: In a fortnight, 56 coroner-free citizens returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.