अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, सात लाखांची रोकड जप्त, २४ जुगाऱ्यांवर कारवाई

By साहेबराव नरसाळे | Published: October 29, 2023 06:54 PM2023-10-29T18:54:28+5:302023-10-29T18:54:36+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

Gambling den raided in Ahmednagar, seven lakh cash seized, action taken against 24 gamblers | अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, सात लाखांची रोकड जप्त, २४ जुगाऱ्यांवर कारवाई

अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, सात लाखांची रोकड जप्त, २४ जुगाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर : नगर शहरातील कोठला येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून २४ जुगाऱ्यांवर कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ७ लाख ३६ हजार ६४० रुपयांची रोकड, एक स्कॉर्पिओ गाडी, विविध प्रकारचे १९ मोबाइल फोन, जुगार खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून आहेर यांनी कोठला येथील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक विजय ठोंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, मच्छिंद्र बर्डे, चालक संभाजी कोतकर, अरुण मोरे यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी कोठला येथील दोन खोलीत गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हारजितीचा तिरट जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी या आरोपींवर तोफखाना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगारविरोधी कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर झाली कारवाई

गफार वजीर शेख (वय ६०, रा. मुकुंदनगर), राजू मेहबूब शेख (वय ४८, रा. प्रेमदान हाडको नगर), संभाजी महादेव निस्ताने (वय ५०, रा. सर्जेपुरा, अहमदनगर), अँगस्टीन जॉर्ज गोन्साल्विस (वय ३८, रा. तारकपूर), इमाम इब्राहिम पठाण (वय ६०, रा. नेप्तीरोड, केडगाव), बाळासाहेब सुभाष खटके (वय ५०, रा. कायनेटिक चौक, नगर), किरण प्रभाकर पानपाटील (वय ५२, रा. सदर बाजार भिंगार), बाळासाहेब एकनाथ चेंडवाल (वय ५४, रा. गुंजाळी, ता. राहुरी), किरण भगतराम बहुगुणा (वय ४५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला), बालाजी कृष्णहरी बिजा (वय ४५, रा. सावेडी, नगर), अरबाज खलील शेख (वय २४, रा. कोठला), सुल्तान हनिफ शेख (वय २९, रा. कोठला), जिशान राजू इनामदार (वय ३२, रा. मुकुंदनगर, नगर), निसार अजिज शेख (वय ६०, रा. इदगाह मैदान, ता. शेवगाव), जाहिद रऊफ सय्यद (वय १९, रा. कोठला), राहुल रंगनाथ आल्हाट (वय ३७, रा. पिंपळगाव उजैन, ता. नगर), छबुराव बाबुराव येळवंडे (वय ७०, रा. घोडेगाव, ता. नेवासा), अनिल नारायण फुलारी (वय ४३, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), तबरेज इसाक शेख (वय ४२, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), रफिक गुलाब शेख (वय ६३, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), अख्तर जानमहंमद शेख (वय ४५, रा. झेंडीगेट, नगर), इस्माईल हसन पठाण (वय ६४, रा. गजराजनगर, बुऱ्हाणनगर), अर्शद आयुब शेख (वय ३१, रा. मुकुंदनगर), शुभम विजय देवळालीकर (वय २७, रा. कराचीवालानगर, नगर) हे जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

Web Title: Gambling den raided in Ahmednagar, seven lakh cash seized, action taken against 24 gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.