दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By admin | Published: August 31, 2016 12:26 AM2016-08-31T00:26:27+5:302016-08-31T00:31:52+5:30

कोपरगाव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीस शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना संवत्सर शिवारात घडली.

Gang of robbers | दरोडेखोरांची टोळी जेरबंद

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Next

कोपरगाव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीस शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना संवत्सर शिवारात घडली. याप्रकरणी तिघा तरूणांना अटक करण्यात आली असून फरार दोघांचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव-वैजापूर महामार्गावर संवत्सर शिवारातील रेल्वे पुलानजीक रणजीत धरमसिंग मुळेकर (वय २२), सागर चंद्रभान घाडगे (वय २५) व वसंत अशासशस्त्र साळूंके (वय २०) सर्व रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलका हे त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांसह लाठ्या, कंबरेस खोसलेली कुकरी, चाकू सारखे घातक शस्त्र घेवून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला दबा धरून बसले होते. दरम्यान रात्रीची गस्त घालताना ही टोळी शहर पोलिसांच्या निदर्शनास आली. दरम्यान पोलिसांनी त्यांना हटकल्यावर संशय आल्याने झाडाझडती घेतली असता लाकडी दांडके, काठ्या, लोखंडी कुकरी, चाकू अशी हत्यारे त्यांच्याजवळ सापडली. पोलिसांनी त्यांची धरपकड केली. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तिघा आरोपींकडील लाल रंगाची बजाज डिस्कव्हर (क्रमांक एम.एच.२०, पी.आर.८१४५) दुचाकी, १५ हजाराची रोकड तसेच सर्व हत्यारे जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. देवरे, उपनिरीक्षक एस. जी. जोशी यांनी भेट दिली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Gang of robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.