देवमाणूस... निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन डॉक्टरांनी केले मोफत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:18 PM2022-02-08T13:18:29+5:302022-02-08T13:19:21+5:30

प्रभावती भिंगारदिवे या महिलेस ना घर ना दार. त्यामध्ये एक पाय अगोदरच मोडल्याने अपंगत्व आले होते. अग्निपंख फाऊंडेशनच्या सदस्यांनी ही परिस्थिती जाणली.

Godman ... free treatment by going to the old woman's hut by doctor of shrigonda | देवमाणूस... निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन डॉक्टरांनी केले मोफत उपचार

देवमाणूस... निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन डॉक्टरांनी केले मोफत उपचार

Next

अहमदनगर/श्रीगोंदा : शहरातील प्रभावती भिंगारदिवे या निराधार वृद्ध महिलेचे पाय आणि हाताचे हाड मोडल्याने ती जीवघेण्या वेदनांचा सामना करीत होती. शहरातील हाडांचे तज्ज्ञ डॉ. अनिल शिंदे यांनी तिच्या झोपडीत जाऊन पैसे न घेता पाय, हातावर उपचार केले.

प्रभावती भिंगारदिवे या महिलेस ना घर ना दार. त्यामध्ये एक पाय अगोदरच मोडल्याने अपंगत्व आले होते. अग्निपंख फाऊंडेशनच्या सदस्यांनी ही परिस्थिती जाणली. महिलेला पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी दहा हजारांची मदत केली. शेडचे काम चालू असताना प्रभावती भिंगारदिवे यांचा एक पाय आणि हात एकाच वेळी मोडला. भिंगारदिवे यांच्याकडे मोफत उपचार व स्वस्त धान्यसाठी आवश्यक असलेले रेशनकार्ड नव्हते. तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी एक दिवसात रेशनकार्ड देण्याचे सहकार्य केले.

भिंगारदिवे यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार झाले नाहीत. नंतर पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, काही फायदा झाला नाही. प्रभावती भिंगारदिवे या श्रीगोंद्यात आल्या. दरवाजा नसलेल्या झोपडीत जीवघेण्या वेदनांशी झुंज देऊ लागल्या. या महिलेच्या वेदनादायी समस्यांकडे डॉ. अनिल शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यांनी झोपडीत जाऊन भिंगारदिवे यांच्या पायावर प्लास्टर केले. अग्निपंखचे विश्वस्त मधुकर काळाणे, अरिहंत महिला उद्योग समूहाच्या प्रतिभा गांधी यांनी औषधांसाठी मदत केली. भिंगारदिवे यांच्या अपूर्ण झोपडीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशांत देसाई, महावितरणचे शाखाभियंता काळे यांनी वीज देण्यासाठी मदतीची भूमिका घेतली.

विद्यार्थ्यांवरही मोफत उपचार..

जीवनात गरिबी काय असते मी अनुभवली आहे. त्यामुळे प्रभावती भिंगारदिवे या वृद्ध आजीच्या पायावर प्लास्टर केले. श्रीगोंदा तालुक्यातील अनाथ निराधार व भूमिहीन इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खेळताना अगर अपघातात हातापायाचे हाड मोडले तर अशा विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे. मात्र त्यासाठी मुख्याध्यापकांची शिफारस आवश्यक आहे, असे डॉ. अनिल शिंदे यांनी सांगितले.
 

Web Title: Godman ... free treatment by going to the old woman's hut by doctor of shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.