आयएएस पूजा खेडकर यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातून घेतले नेत्र दिव्यांग, मानसिक आजारचे प्रमाणपत्र

By अण्णा नवथर | Published: July 13, 2024 02:11 PM2024-07-13T14:11:20+5:302024-07-13T14:17:33+5:30

आयएएस पूजा खेडकर यांचे कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून नेत्र दिव्यांक व मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची चर्चा होती.

IAS Pooja Khedkar obtained the certificate of visually impaired, mentally ill from the district hospital of the city | आयएएस पूजा खेडकर यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातून घेतले नेत्र दिव्यांग, मानसिक आजारचे प्रमाणपत्र

आयएएस पूजा खेडकर यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातून घेतले नेत्र दिव्यांग, मानसिक आजारचे प्रमाणपत्र

अहमदनगर :  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून  2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र व 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.

आयएएस पूजा खेडकर यांचे कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून नेत्र दिव्यांक व मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची चर्चा होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयकडून माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता 2018 मध्ये खेडकर यांना नेत्र दिव्यांग व 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले गेल्याची पुरावे आढळून आले आहेत. तत्कालीन वैद्यकीय मंडळाने 2021 मध्ये एकत्रित करून दोन्ही याचे प्रमाणपत्र दिल्याचे अभिलेखा नुसार आढळून आलेले आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र सोबतच नॉन क्रिमीलेअर हे प्रमाणपत्र देखील संशयाचे फेऱ्यात अडकले आहे. त्यांनी एका इंटरव्यू मध्ये आपले आई-वडील विभक्त असल्याचा दावा केला होता, परंतु त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते तसेचं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण 40 कोटीहून अधिक मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. परंतु नॉन क्रिमिनलसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांनी मिळवलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रावर देखील प्रश्नचिन्ह आहे.

Web Title: IAS Pooja Khedkar obtained the certificate of visually impaired, mentally ill from the district hospital of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.