नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही; विवेक कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 9, 2024 03:44 PM2024-07-09T15:44:31+5:302024-07-09T15:44:45+5:30

कोपरगावात बारा वर्षांपासून बंद झालेला रॅक पॉईंट नव्याने सुरू

IFFCO will not allow shortage of fertilizers in Nagar district says Vivek Kolhe | नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही; विवेक कोल्हे

नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही; विवेक कोल्हे

कोपरगाव (जि. अहमदनगर) : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन इफको (नवी दिल्ली) संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील कोपरगाव शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे बारा वर्षांपासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईंट नव्याने सुरू करण्यात आला, त्याची विधिवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अहमदनगर जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई यांनी प्रास्तविक केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यासह आसपासच्या शेतकरी बांधवांना सातत्याने जाणवणारा इफको खतांचा तुटवडा लक्षात घेऊन कोपरगाव येथे सन २००७ मध्ये रॅक सुरू केला होता. मध्यंतरीच्या कालखंडात तो बंद पडला त्यामुळे आपली गैरसोय झाली तो पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले. आगामी काळात आपल्या भागात युवकांसाठी ठोस काही रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी इफकोचे सहकार्य घेणार आहे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, राजेंद्र लोणारी, सरपंच विजय काळे, कैलास संवत्सरकर, उपसरपंच शाम संवत्सकर, मच्छिंद्र लोणारी, नानासाहेब थोरात, कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, स्टेशन मॅनेजर बी. एस. प्रसाद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इफकोचे क्षेत्र अधिकारी तुषार गोरड यांनी केले, तर आभार भाऊसाहेब वाघ यांनी मानले.

अपघात विमा पूर्वीपेक्षा दुप्पट

इफकोद्वारे खरेदी करण्यात आलेल्या नॅनो युरिया आणि खाद यावर अपघात विमा पूर्वी पेक्षा दुप्पट करण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाखापर्यंत कमाल मर्यादा असलेला अपघात विमा खाद खरेदीवर मिळणार आहे. त्यासाठी केवळ खरेदी पावती जपून ठेवावी लागणार आहे. यासह शेतकऱ्यांनी ऑपरेशन अथवा गंभीर आजारावर उपचाराकरीता किसान फंडाद्वारे वैद्यकीय मदत २५ हजारापर्यंत मिळण्यासाठी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.

Web Title: IFFCO will not allow shortage of fertilizers in Nagar district says Vivek Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.