‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे

By admin | Published: July 25, 2016 11:59 PM2016-07-25T23:59:10+5:302016-07-26T00:02:55+5:30

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकांनी सोमवारी नगर तालुक्यातील वाळकी, खडकी तसेच नेवासा तालुक्यातल सोनई व वरखेड येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना ताब्यात घेतले़

Impressions of 'production fee' on liquor shops | ‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे

‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे

Next

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकांनी सोमवारी नगर तालुक्यातील वाळकी, खडकी तसेच नेवासा तालुक्यातल सोनई व वरखेड येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना ताब्यात घेतले़ यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक एस़ पी़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, अरुण तातळे व जावळीकर यांनी ही कारवाई केली़ वरखेड व सोनई येथे गावठी हातभट्टी तयार केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती़ पथकाने अचानक छापा टाकत दारू बनविणाऱ्यांना ताब्यात घेतले़ तसेच यावेळी घटनास्थळी आढळून आलेली दारु नष्ट करण्यात आली़ तयार करण्यात आलेल्या दारुची दुचाकीवरून वाहतूक करण्यात येत होती़ पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या या तीन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत़
कारवाई दरम्यान पथकाने २०० लीटरचे लोखंडी बॅरल, ११़ ३० लीटर दारू बनविण्याचे रसायन, दोन प्लास्टिक कॅन, ३५ लीटर गावठी दारू तसेच ४८ दारुच्या बाटल्या जप्त केल्या़
सायंकाळी नगर तालुक्यातील खडकी व वाळकी शिवारात दारू अड्ड्यांवर छापे टाकून १८०० लीटर रसायन जप्त करत ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या कारवाईत एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला़ उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडल्याने हातभटी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: Impressions of 'production fee' on liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.