मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे- इंदोरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:37 PM2020-02-18T13:37:09+5:302020-02-18T14:35:26+5:30
अकोले (जि. अहमदनगर): लिंगनिदानाबाबत वक्तव्य असलेल्या व्हीडिओनंतर निवृत्ती महाराज इंदोरीकर चांगलेच अडचणीत आले आहे. यावर आता खुद्द इंदोरीकर यांनीच माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले.
अकोले (जि. अहमदनगर): लिंगनिदानाबाबत वक्तव्य असलेल्या व्हीडिओनंतर निवृत्ती महाराज इंदोरीकर चांगलेच अडचणीत आले आहे. यावर आता खुद्द इंदोरीकर यांनीच माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे आता वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. इंदोरीकर यांनी माफीनामा जारी करत ही माफी मागितली आहे. या पत्रकात इंदोरीकर यांनी म्हटले आहे की, मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे. माफी मागताना त्यांनी सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला आहे.