छेड काढणाऱ्याची तरूणीने केली धुलाई

By Admin | Published: August 24, 2016 12:14 AM2016-08-24T00:14:47+5:302016-08-24T00:44:42+5:30

पाथर्डी : छेड काढल्याने संतप्त झालेल्या तरूणीने रूद्रावतार धारण करीत छेड काढणाऱ्या तरूणाची भर रस्त्यात धुलाई केली. मंगळवारी सायंकाळी पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकाशेजारी ही घटना घडली.

Lauded by the victim's teenager | छेड काढणाऱ्याची तरूणीने केली धुलाई

छेड काढणाऱ्याची तरूणीने केली धुलाई

googlenewsNext


पाथर्डी : छेड काढल्याने संतप्त झालेल्या तरूणीने रूद्रावतार धारण करीत छेड काढणाऱ्या तरूणाची भर रस्त्यात धुलाई केली. मंगळवारी सायंकाळी पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकाशेजारी ही घटना घडली. तरूणी का मारीत आहे? याची माहिती कळताच त्या ठिकाणी असलेल्या काही तरूणांनी हात धुऊन घेत पुन्हा त्याची यथेच्छ धुलाई करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अफसर मुनीर शेख असे या तरूणाचे नांव आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.
माळीबाभूळगाव येथील तरूणी गावाकडे जाण्यासाठी नगर रस्त्यावरील रिक्षात बसली होती.
अफसर शेखने तेथे येऊन तिला चिठ्ठी दिली. तिने तू कोण आहे? मला का चिठ्ठी देतो?, असे म्हणताच शेख याने चिठ्ठी फाडून टाकत तिला मारहाण करून निघून जाण्यास सुरुवात करताच रिक्षातून उतरुन त्याचा पाठलाग करीत या तरूणीने त्याची धुलाई केली. तरूणी मुलास मारहाण करीत असल्याचे पाहून काही तरूण तिच्या मदतीला धावले. त्यांनी शेख यास मारहाण करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. घटना शहरात समजताच पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.
(तालुका प्रतिनिधी)
पाथर्डी शहरातील प्रत्येक चौकात मुलींचे छेडछाडीचे प्रकार घडत असून शाळा व महाविद्यालये तसेच खाजगी क्लास सुरू व सुटण्याच्या वेळेस विना क्रमांकाच्या मोटारसायकली तसेच मोठ्याने हॉर्न वाजविणे असे प्रकार रोेजच घडत आहेत. तक्रार नाही म्हणून पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत. गेल्या महिन्यात पोलिसांनी रोडरोमिआेंच्या विरोधात मोहीम राबविली होती. पण आता ही मोहीम शांत झाल्याने रोडरोमिओंनी परत डोके वर काढले आहे. त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी शहरातून होत आहे.

Web Title: Lauded by the victim's teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.