उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 11:02 PM2016-04-24T23:02:37+5:302016-04-24T23:15:51+5:30

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर शिवारात सोनगाव रस्त्यावर रामपूर फाट्यानजीक जालिंदर खर्डे यांच्या शेतात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

Leopard death caused by starvation | उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू

उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू

googlenewsNext

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर शिवारात सोनगाव रस्त्यावर रामपूर फाट्यानजीक जालिंदर खर्डे यांच्या शेतात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. साधारणपणे साडेतीन ते चार वर्षे वयाचा व नर जातीचा हा बिबट्या उपासमारीमुळे मृत पावल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले.
कोल्हार भगवतीपूर शिवारात जालिंदर खर्डे यांच्या शेतात बिबट्या पडून असल्याचे बाळा हरि दळे यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब आसपासच्या रहिवाशांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, धापा टाकत असताना बिबट्या गतप्राण झाला. कोल्हार बुद्रूकचे उपसरपंच स्वप्नील निबे, भगवतीपूरचे माजी उपसरपंच श्रीकांत खर्डे, पोलीस पाटील सुखलाल खर्डे यांनी या घटनेची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. शिर्डी विभागाचे वनरक्षक दशरथ झिंजुर्के, राहुरी विभागाचे लक्ष्मण किनकर घटनास्थळी आले.
दरम्यान, बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळाली येथील वनचेतना केंद्रात मोटारीतून नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचे निदान डॉ. सातपुते यांनी केले.
(वार्ताहर)

Web Title: Leopard death caused by starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.