‘लोकमत एस्पायर’चा आजपासून प्रारंभ

By admin | Published: May 30, 2014 01:07 AM2014-05-30T01:07:12+5:302014-05-30T01:15:16+5:30

अहमदनगर : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर- २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे.

'Lokmat Aspire' starts today | ‘लोकमत एस्पायर’चा आजपासून प्रारंभ

‘लोकमत एस्पायर’चा आजपासून प्रारंभ

Next

अहमदनगर : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर- २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे फेअर दि. ३० मे ते १ जून २०१४ पर्यंत सावेडी रोड वरील गायकवाड सांस्कृतिक भवन, बिग बाजार समोर येथे (वेळ सकाळी १० ते रात्री ८ वा.) होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे व डॉ.बी. सदानंदा (ले. जन. सेक्रेटरी जनरल, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन) यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता होणार आहे. जसजसा जून महिना जवळ येईल तसतसे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे थैमान घातलेले असते. याचाच विचार करून मनातील लाखो प्रश्न सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा इथपासून ते कोणते प्रोफेशनल कोर्स करावेत व कोणत्या कोर्समुळे आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होईल, कोणत्या कोर्ससाठी कोणते महाविद्यालय दर्जेदार आहे, निवडलेल्या दर्जेदार कोर्ससाठी कोणत्या महाविद्यालयात अनुदान आहे की नाही व फी किती आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहेत. व्यावसायिकांसाठी संधी शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित महाविद्यालये, शाळा, मेडिकल/ अभियांत्रिकी महाविद्यालये, युवक विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, कॉम्प्युटर संबंधीच्या सर्व प्रकारचे कोर्स उपलब्ध करून देणारे क्लासेस, अ‍ॅनिमेशन, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, आय.टी.आय., पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, या सर्व इन्स्टिट्यूट व्यावसायिकांना एस्पायर एज्युकेशन फेअर- २०१४ या प्रदर्शनामध्ये सहभाग होऊन लाखो विद्यार्थी व पालकांना भेटून त्यांच्या शंकाचे निरसन करण्याची व सहजरित्या अ‍ॅडमिशन कसे मिळतील या व्यावसायिकांच्या प्रश्नाचे उत्तर या संधीमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सेमिनार दि. ३० मे १४, वेळ : सायं. ४ ते ५, मार्गदर्शक- संतोष रासकर. इन्स्टिट्यूट : सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे. विषय : करिअर इन अ‍ॅनिमेशन. दि. ३० मे १४, वेळ- सायं. ५ ते ६ मार्गदर्शक- डॉ.अरुण इंगळे. इन्स्टिट्यूट- पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, विळद घाट, अ.नगर. विषय : व्यावसायिक अभ्यासक्रम मार्गदर्शन. लोकमत समूहातर्फे आयोजित लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ या शैक्षणिक प्रदर्शनात भेट देणार्‍या प्रत्येकाला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.याअंतर्गत गायकवाड सांस्कृतिक भवन, बिगबाजारसमोर, सावेडी रोड येथे भेट देणार्‍या भाग्यवंत विजेत्यांना दर दिवशी दर तासाला चांदीचे नाणे जिंकता येणार आहे. तसेच दर दिवशी होणार्‍या लकी ड्रॉमध्ये आकर्षक मोबाईलही जिंकण्याची संधी आहे. अभ्यासक्रम मार्गदर्शन दहावी, बारावीनंतर कोणता व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा, या क्षेत्रातील करिअरविषयक सर्व शंकांचे निरसन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन येथील आय.बी.एम.आर.डी. (एमबीए) चे प्राचार्य डॉ.अरुण इंगळे हे करणार आहेत. या सेमिनारमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. कौशल्यांचा विकास चित्रपट, जाहिरात आणि कार्टुनपुरते मर्यादित असणारी अ‍ॅनिमेशन कला संगणकाच्या युगात प्रत्येक उद्योगासाठी सादरीकरणाचे कलात्मक तंत्र बनले आहे. अ‍ॅनिमेशन म्हणजे काय? अ‍ॅनिमेशन क्षेत्रात करिअर कसे करावे,या विषयीचे मार्गदर्शन संतोष रासकर हे करणार आहे. सहभागी होणार्‍यांना ३ डी लघुपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच विजेत्यांना ३डी चित्रपटाची डीव्हीडी व ३डी गॉगल्स मिळणार आहे.

Web Title: 'Lokmat Aspire' starts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.