शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा कारभार २० प्रशासकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:25 PM2020-09-05T16:25:04+5:302020-09-05T16:25:38+5:30

शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ आॅगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत.

Management of 32 Gram Panchayats in Shevgaon taluka is in the hands of 20 administrators | शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा कारभार २० प्रशासकांच्या हाती

शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा कारभार २० प्रशासकांच्या हाती

Next

शेवगाव : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ आॅगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत.

 तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट महिन्यात संपली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचा कारभार आता २० प्रशासकांच्या हाती आला आहे. 
        
प्रशासकांना सरपंचांचे सर्वाधिक अधिकार देण्यात आले आहेत. कारभार करताना गैरवर्तन, कसूर केल्यास कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. 

Web Title: Management of 32 Gram Panchayats in Shevgaon taluka is in the hands of 20 administrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.