मराठा कार्यकर्ते आक्रमक! शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांचा बॅनर

By अरुण वाघमोडे | Published: October 29, 2023 03:49 PM2023-10-29T15:49:41+5:302023-10-29T15:49:55+5:30

मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांचे गाड्या अडवून त्यांना गावबंद केली जात आहे.

Maratha activists aggressive minister's banner was torn by breaking into the teachers' convention |  मराठा कार्यकर्ते आक्रमक! शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांचा बॅनर

 मराठा कार्यकर्ते आक्रमक! शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांचा बॅनर

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांचे गाड्या अडवून त्यांना गावबंद केली जात आहे. रविवारी (दि.२९) नगरमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात घुसून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर लावण्यात आलेला मंत्र्याचा बॅनर फाडला. दरम्यान कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून आयोजकांनी स्वत:हून हा बॅनर खाली उतरवून घेतला.

नगर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर रोडवर एका मंगल कार्यालयात रविवारी प्राथमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहणार होते. ते मात्र, या कार्यक्रमाला आले नाही. दरम्यान कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर मंत्री केसरकर यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्राविकास मंत्री गरिष महाजन यांचे फोटो होते. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला प्रारंभ होताच कार्यक्रमस्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जात प्रचंड घोषणाबाजी करत थेट बॅनरवर हल्ला चढविला. यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी असल्याचे एकच गोंधळ उडाला. दरम्यान आयोजकांनी स्वत:हून बॅनर काढला.

Web Title: Maratha activists aggressive minister's banner was torn by breaking into the teachers' convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.