खासदार "मुंगी"वर संतापले

By admin | Published: August 22, 2016 11:31 AM2016-08-22T11:31:59+5:302016-08-22T11:31:59+5:30

अहमदनगर येथील खासदार दिलीप गांधी यांची तिरंगा यात्रा रविवारी मुंगी (ता. शेवगाव) येथे पोहोचली.

MP angry at "ant" | खासदार "मुंगी"वर संतापले

खासदार "मुंगी"वर संतापले

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
बोधेगाव, दि. २२ -   अहमदनगर येथील खासदार दिलीप गांधी यांची तिरंगा यात्रा रविवारी मुंगी (ता. शेवगाव) येथे पोहोचली. तेथील सभेत गावातील असुविधांबाबत खा. गांधी यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी स्वत: पाच हजार रुपये देवून ग्रामस्थांच्या हातात झोळी दिली. 
 
मात्र यावेळी खा. गांधी यांनी वापरलेला एक अपशब्द क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र गांधी यांचा संताप योग्य असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेत गाव निर्मल करण्याची शपथ घेतली. खा. गांधी यांची १५ ऑगस्टपासून निघालेली मोटारसायकल रॅली रविवारी मुंगीत पोहोचली. एस. टी. बसस्थानक ते ग्रामपंचायत कार्यालय असा गांधी यांनी मोटारसायकलवरून गावात फेकफटका मारला. 
 
यावेळी खा. गांधी यांना तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्यामुळे येणारी दुर्गंधी, रस्त्यावरच साचलेले कचर्‍याचे ढीग, मोठे-मोठे खड्डे अशी परिस्थिती दिसली. अशा गावात तुम्ही कसे राहता? तुम्ही काय नपंसुक आहात काय? अशा शब्दात खा. गांधी यांनी ग्रामस्थांना सवाल केला.
 
बोधेगाव येथे ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देताना खासदार दिलीप गांधी. गावाची दुर्दशा पाहून मी अस्वस्थ झालो. बोलण्याच्या भरात अपशब्द वापरला गेला असेल. मात्र तो अपशब्द नव्हे तर ग्रामस्थांच्या उदासीनतेबाबत उस्फूर्त प्रतिक्रिया होती. ग्रामस्थांच्या हितासाठीचा माझा संताप होता. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर गावे गलिच्छ राहणार नाहीत. तिरंगा यात्रा ही लोकांना जागे करण्यासाठीच आहे. मुंगी गाव दत्तक घेतले आहे. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला असून, जि.प. प्रशासनाला गाव स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत.
- खासदार  दिलीप गांधी

Web Title: MP angry at "ant"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.