दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

By admin | Published: July 19, 2016 11:45 PM2016-07-19T23:45:04+5:302016-07-20T00:24:24+5:30

जामखेड : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेड वकील संघाने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला.

The next day the sterilized shutters | दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

Next

 

 

जामखेड : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेड वकील संघाने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला. तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिले. जामखेड वकील संघाची बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता संघाच्या सभागृहात अध्यक्ष अ‍ॅड. विश्वास निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत या घटनेचा निषेध करून न्यायालयीन कामकाज बंद करणे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, आरोपींचे वकीलपत्र कोणी घेऊ नये व घेतल्यास पंधरा वर्षांकरीता बार कौन्सिलचे सदस्य रद्द करणे व बार कौन्सिलची निवडणूक लढविण्यास बंदी घालणे असे महत्वपूर्ण ठराव सवार्नुमते मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी निषेध फेरी काढली. तहसीलदार सुशील बेल्हेकर व पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. निवेदनावर संघाचे अध्यक्ष विश्वास निकम, उपाध्यक्ष ए. बी. कोरे, सचिव अल्लाउद्दीन शेख, सदस्य चंद्रकांत ढाळे, नवनीत बोरा, प्रवीण सानप, शमा हाजी, संग्राम पोले, काळे, पवार, राऊत, गोले आदींची नावे आहेत. भेंड्यात अर्धा दिवस बंद भेंडा : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ भेंडा (ता. नेवासा) येथील व्यापारी संघटनेच्यावतीने मंगळवारी अर्धा दिवस बंद पाळण्यात आला. भेंडा बुद्रूक ग्रामपंचायत व जिजामाता महाविद्यालयानेही या घटनेचा निषेध केला आहे. या बंदमध्ये सर्व पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या. बसस्थानक चौकात आयोजित निषेध सभेत बाळासाहेब वाघडकर,नामदेव निकम,सोपान महापूर, विद्यार्थिनी दीपाली ढोकणे, किरण गव्हाणे, ऐश्वर्या नवले, भाऊसाहेब सावंत, रिपाइंचे शाम सोनकांबळे, भाजपाचे अंकुश काळे, राष्ट्रवादीचे गणेश गव्हाणे, भगतसिंग प्रतिष्ठानचे शरद आरगडे, नामदेव शिंदे, कृष्णा उगले यांची भाषणे झाली. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून कायद्यात बदल करण्याची सूचना या वक्त्यांनी केली. भेंडा महाविद्यालयासमोर थांबणाऱ्या टारगट मुलांचा बंदोबस्त ग्रामस्थ करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सभेस अशोक वायकर, रवींद्र गव्हाणे, रमेश पाडळे , विनायक मिसाळ, डॉ.ईश्वर उगले, येडूभाऊ सोनवणे, संतोष मिसाळ, सतीश शिंदे, ज्ञानदेव कोलते तसेच नागरिक हजर होते. मंडलाधिकारी जयंत दरंदले यांना निवेदन देण्यात आले. वकिलपत्रास विरोध बालमटाकळी (ता. शेवगाव) : कोपर्डी अत्याचार प्रकरणी बालमटाकळी येथील व्यापारी व गावकऱ्यांनी दिवसभर बंद पाळून घटनेचा निषेध केला. तसेच कोणत्याही वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात निषेध सभा झाली. शेवगाव बाजार समितीचे उपसभापती रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, चंद्रकांत बागडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष कासम शेख,अशोक खिळे, गणेश भोंगळे यांनी या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र वकिलांनी घेऊ नये, त्यास जामीन मिळू न देता त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशा मागण्या यावेळी केल्या. याप्रसंगी ग्रामस्थांनी निषेध सभेत सहभागी होऊन घटनेचा तीव्र निषेध केला. विक्रम बारवकर, रमेश वाघ, चंद्रकांत गरड, भानुदास गलधर, माणिक शिंदे, अनिल परदेशी, संदीप देशमुख, प्रशांत देशमुख, सुदाम शिंदे, कमू शेख, निखिल वाघुंबरे, भैय्यासाहेब देशमुख, अशोक छाजेड, अनिल गुंजाळ, अविनाश खेळकर आदी हजर होते. पुतळ्याचे दहन नेवासा फाटा : कर्जत तालुक्यातील कोपर्डी प्रकरणी नेवासा तालुक्यातील भानसहिवरा गावात बंद पाळून सर्व पक्ष, सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्या वतीने आरोपींचा प्रतीकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे, सरपंच देविदास साळुंके, भगवान जाधव, संदीप भगणे, धनेश मुनोत, बाबासाहेब ढवाण, किशोर भणगे, जनार्धन पटारे यांनी केले. गावातील सर्व व्यवहार बंद होते. तसेच गावातील सर्व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी संघटितपणे लढण्याचा तसेच शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव मोहिटे, जनार्दन पटारे, अ‍ॅड.काळे, भगवान जाधव, संभाजी माळवदे, देविदास किशोर भणगे यांची भाषणे झाली. चापडगावात बंद चापडगाव : कोपर्डी अत्याचार प्रकरणी चापडगाव (ता. शेवगाव) ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. सरपंच संजीवनी गायकवाड, उपसरपंच पंडितराव नेमाणे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बंडू गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख भारत लोहकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, कृषकचे तालुकाध्यक्ष शंकरराव गुठे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड आदींनी बंदचे आवाहन केले होते. या सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बोधेगावात निवेदन बोधेगाव : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बोधेगाव येथे सर्वपक्षीय ग्रामस्थांनी बंद पाळून गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले. बोधेगाव येथे मंगळवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजारपेठेतील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. माजी सरपंच राम अंधारे, प्रकाश भोसले, विठ्ठलराव तांबे, भाऊराव भोंगळे, बाळासाहेब तहकीक, राम केसभट, मयूरराजे हुंडेकरी, बबन कुरेशी, अंकुश चव्हाण यांनी बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलीस हेडकाँस्टेबल तुकाराम काळे यांना निवेदन दिले. निघोजमध्ये फेरी निघोज : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ येथील मळगंगा देवी मंदिरात मेणबत्ती लावून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसराला फेरी मारुन निषेध सभा घेण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा व स्त्री अत्याचार करणारांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा ठराव सभेत करण्यात आला. यावेळी सरपंच ठकाराम लंके मित्र मंडळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त अमृत रसाळ, मंगेश लंके, विश्वास शेटे, स्वराज्य संस्थेचे गणेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर लंके, रोहिदास लामखडे, मोहन खराडे, सतीश साळवे, डॉ. नामदेव घोगरे, शंकरवरखडे, मंगेश भागवत, सुनील वराळ, ग्रामस्थ हजर होते. वाळकीत बंद वाळकी : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटने प्रकरणी वाळकी येथे मंगळवारी बंद पाळून निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सभेत कार्यकर्त्यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. मारूती चौकात निषेध सभा झाली. सरपंच संग्राम गायकवाड, उपसरपंच देवराम कासार, भाजपाचे तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग, संभाजी कासार, नामदेव भालसिंग, मोहन बोठे, राम भालसिंग, शरद बोठे, संदिप बोठे, बबु पठाण, संदीप जाधव आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The next day the sterilized shutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.