निघोज,सोनईत मूक मोर्चा,अरणगाव,वडाळ्यात बंद

By admin | Published: July 20, 2016 11:45 PM2016-07-20T23:45:36+5:302016-07-20T23:48:35+5:30

निघोज : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ निघोज (ता. पारनेर) ग्रुप ग्रामपंचायत व शिवबा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गावातून मूक मोर्चा काढून निघोज दूरक्षेत्रानजीक निषेध सभा घेण्यात आली.

Nimoj, Soneet silent march, shuttle in Varanasi, Varanasi | निघोज,सोनईत मूक मोर्चा,अरणगाव,वडाळ्यात बंद

निघोज,सोनईत मूक मोर्चा,अरणगाव,वडाळ्यात बंद

Next

निघोज : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ निघोज (ता. पारनेर) ग्रुप ग्रामपंचायत व शिवबा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गावातून मूक मोर्चा काढून निघोज दूरक्षेत्रानजीक निषेध सभा घेण्यात आली.
सरपंच ठकाराम लंके म्हणाले, आरोपींना लवकर व कडक शासन झाल्यास या प्रवृत्तीला आळा बसेल. सामाजिक कार्यकर्ते व दारुबंदी चळवळीचे प्रणेते बबनराव कवाद म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन समाजातील अत्याचारीत महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे. हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल. दारुच्या व्यसनामुळे अनेक गुन्हे घडतात. त्यामुळे दारुबंदी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रा. ज्ञानेश्वर कवाद, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, पुष्पा वराळ, डॉ. खोसे, विठ्ठलराव कवाद, राजेंद्र लाळगे, गणेश शेटे, वरखडे, गणेश लंके, सोनवणे, मुलिकादेवी विद्यालयाचे प्राचार्य सुकटे, पठार,घोलप, शिंदे तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
निघोज ग्रामपंचायत, शिवबा संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारनेर तालुका व श्री मुलिकादेवी विद्यालय व इतर सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी सरपंच ठकाराम लंके मित्र मंडळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, उपाध्यक्ष संदीप कवाद, भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश लंके, बबनराव कवाद, प्रा. ज्ञानेश्वर कवाद, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त वसंतराव कवाद तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने हजर होते. प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांनी प्रस्ताविक केले. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी आभार मानले.
सोनईत मूक मोर्चा
सोनई : कोपर्डी येथील पीडित मुलीच्या कुटुंबाला शिंगणापूर ग्रामस्थांनी ३५ हजारांची आर्थिक मदत दिली. यासाठी सरपंच बाळासाहेब बानकर, वारकरी परिषदेचे सयाराम बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर अत्याचारित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त शिंगणापूरला भाविकांच्या गर्दीमुळे ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. मोर्चात उपसरपंच अंबादास शेटे, बाळासाहेब कुऱ्हाट, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ३५ हजारांची आर्थिक मदत जमा झाली. सरपंच दादासाहेब वैरागर, विजय जगताप, रमेश घोरपडे, संदीप कुसळकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलने, मोर्चे काढून लोकांना वेठीस धरण्यापेक्षा या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे, असे वारकरी परिषदेचे सदस्य सयाराम बानकर यांनी सांगितले. सोनई येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सोनई पोलिसांना निवेदन दिले. यावेळी सचिन पवार, विजय जगताप, रमेश घोरपडे, सुनील पाडळे, गणेश साबळे, रवी आल्हाट, अमोल वैरागर, आकाश पाटोळे, नजीर सय्यद, अविनाश वैरागर हजर होते. सोनई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध करुन सर्व आरोपींना फासावर लटकावे, अशी मागणी उद्धव आव्हाड, डॉ. बडे, सुभाष राख, भास्कर येळवंडे, बन्सी आवारे, बाळासाहेब दरंदले, शकील बागवान यांनी केली.
वडाळा बहिरोबात बंद
नेवासा फाटा: नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा गावात कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. यावेळी मूक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा झाली. यावेळी जाणता राजा मल्टीस्टेटचे अध्यक्ष दिलीप मोटे, राजेंद्र थोरात, वारकड सर, शोभा पातारे, प्राचार्य सी.बी.वाघमारे, बाळासाहेब मोटे यांची भाषणे झाली.
तेलकुडगावात मोर्चा
कुकाणा : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ तेलकुडगाव ( ता. नेवासा ) येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी गावातून मोर्चा काढून घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर यांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्रीमंत काळे, अध्यापक आबासाहेब घाडगे हजर होते.
पुतळ्याचे दहन
श्रीगोंदा : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी घारगाव येथील साईकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आरोपींच्या पुतळ्याचे दहन केले.
टाकळीत बंद
टाकळी ढोकेश्वर : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ टाकळी ढोकेश्वर येथे कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय, सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. त्यानंतर बसस्थानकावर निषेध सभा घेण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असा ठराव संमत करण्यात आला. लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी पाच हजार सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्याचे यावेळी ठरले. यावेळी सीताराम खिलारी, अर्बन बँकेचे संचालक अशोक कटारिया, सरपंच सुनीता झावरे, उपसरपंच बाबासाहेब खिलारी व मान्यवर हजर होते.
माहिजळगावकर रस्त्यावर
माहिजळगाव : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ माहीजळगाव येथे बुधवारी श्री. विठ्ठल विद्यालय, जि.प.प्रा.शाळा माहीजळगाव व माजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी निषेधफेरी काढली. या फेरीत विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थिनींसह सुमारे ४५० ते ५०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींच्या या फेरीला पाठींबा देत ग्रामस्थांनी नगर-सोलापूर रोडवर रस्ता रोको केला. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थिनींची भाषणे झाली. या भाषणात विद्यार्थिंनींनी आम्हाला भयमुक्त जीवन जगू द्या. इ ५ वीतील अंकिता इरकर हिने अतिशय भावनिक भाषण करून त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या शब्दात निषेध केला. यावेळी सरपंच नाना तोरडमल, उपसरपंच संतोष कुरूळे, अमरजीत खेडकर, किशोर कोपनर, अमोल बामणे, राम शेट, बाळू देशमुख, गोकुळ इरकल, माळी साहेब, प्रवीण खेडकर, प्रकाश कदम, प्राचार्य पठाण हजर होते.
निंबोडीत रास्ता रोको, अरणगावात बंद
अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी व देहरे येथे बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले तर अरणगाव येथे बंद पाळून निषेध सभा घेण्यात आली. अरणगाव येथे शिवक्रांती युवा सेना व ग्रास्थांनी एकत्र येत गाव बंद ठेवून निषेध सभा घेतली. यावेळी शिवक्रांतीचे प्रशांत कल्हापुरे, सरपंच सुजित कोके, सुभाष पुंड, प्रकाश कांबळे, सुधीर कांबळे, नारायण पवार, बाळासाहेब जाधव, अंबादास कल्हापुरे, संतोष दळवी, बाबासाहेब कल्हापुरे, दशरथ शेळके, आनंदराव शेळके, ज्ञानदेव शेळके, हेश पवार, लहू आजबे, रवींद्र्र देशमुख, गोरख कल्हापूरे, बाळासाहेब तकर, माऊली जवळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान,मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कल्हापूरे यांनी केली. निंबोडी येथील आंदोलनाचे नेतृत्व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संदीप खाकर यांनी केले. निंबोडी येथील रास्तारोकोमुळे जामखेड रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात सागर जाधव, परमेश्वर गायकवाड, रामदास दळवी, सागर जाधव, एकनाथ आवारे, नाना नरवडे, सुहास थोरात, सोमनाथ खाकर, बंडू बेरड, बाळासाहेब थोरात, संजय गाडे, दिनानाथ वाघस्कर, दीपक बेरड, महेश निसे, तुकाराम गाडे, दीपक सोलाट, भरत शेडाळे, हुसैन शेख आदी सहभागी झाले होते. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा द्या, अशा घोषणा देवून आंदोलनकांनी परिसर दणाणून सोडला.

Web Title: Nimoj, Soneet silent march, shuttle in Varanasi, Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.