जिल्ह्यात फक्त २० टक्के जलसाठा

By Admin | Published: April 24, 2016 11:08 PM2016-04-24T23:08:14+5:302016-04-24T23:18:49+5:30

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़

Only 20 percent of the water storage in the district | जिल्ह्यात फक्त २० टक्के जलसाठा

जिल्ह्यात फक्त २० टक्के जलसाठा

googlenewsNext

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़ एकमेव मुळा व भंडारदर धरणात पाणीसाठा शिल्लक आहे़ धरणांवरील उपसा वाढल्याने तेथील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, दोन्ही धरणांत फक्त २० टक्के जलसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे पुढील जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता नाही़ मात्र, त्यानंतरही पाऊस पडलाच नाही तर काय, अशी चिंता जिल्ह्याला लागून आहे़
गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीने शंभरी ओलांडली नाही़ पावसाअभावी शेती व्यवसाय उद्धवस्त झाला आहे. दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़ यंदाचे दुष्काळाचे तिसरे वर्ष आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांची भटकंती सुरू आहे़ पाणी पातळी खोल गेल्याने गावातील उद्भव कधीच कोरडे पडले आहेत़ पाणी योजनांनाही घरघर लागली आहे़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर आहे़ गावोगावचे तलाव भरण्यासाठी मुळा व भंडारदरातून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले़ उत्तर नगर जिल्ह्यासाठी मुळातून दक्षिणेतील चार तालुक्यांसाठी कुकडी प्रकल्पातून पाणी आणले़ त्यामुळे उद्भवात पाणी आले़ त्यातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे़ पाऊस वेळेवर न पडल्यास उद्भव भरण्यासाठी पुन्हा सोडावे लागेल, अशी शक्यता आहे़ मात्र मुळा व भंडारदरात २० टक्के पाणी साठा आहे़ त्यामुळे वेळेवर पाऊस न पडल्यास धरणांतील मृतसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ ओढावू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे़
जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढली आहे़ गावांत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची संख्या घटली आहे़ बहुतांश लोक वाड्या-वस्त्यांवर राहतात़ त्यांना पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ प्रशासनाकडून २९३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर सात पाणी योजनाही पूर्ण केल्या गेल्या़ तसेच ४१ पाणी योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे़ याशिवाय ४८० विंधन विहिरी प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या असून, त्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे़ मात्र त्यांना पाणी कमी पडू लागल्याने धरणांतून पाण्याची मागणी होत आहे़ त्यामुळे पुढील काळात धरणांवर अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
यंदा पाणीसाठा नऊ टक्क्यांनी घटला
मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा ९ टक्के कमी आहे़ मागीलवर्षी मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात २९़ ९९ टक्के पाणीसाठा होता़
पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
भंडारदरा- १, ५६९, मुळा-६,६३८, निळवंडे-७०७.

Web Title: Only 20 percent of the water storage in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.