गतिमंद मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 05:03 AM2016-04-25T05:03:10+5:302016-04-25T05:03:10+5:30

येथील एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी रात्री एका तरुणाने अत्याचार केले. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

Oppressed girl | गतिमंद मुलीवर अत्याचार

गतिमंद मुलीवर अत्याचार

Next

वांबोरी (जि. अहमदनगर) : येथील एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी रात्री एका तरुणाने अत्याचार केले. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.
आत्माराम यशवंत वाघ (२३, वांबोरी, ता. राहुरी) असे या नराधमाचे नाव असून, त्याने पीडितेला गावापासून दूर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिने आरडाओरड केल्यानंतर काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला. घटनेची फिर्याद पीडितेने वांबोरी पोलिसांत दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Oppressed girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.