नगर-औरंगाबाद रोडवर पेट्रोल पंप लुटला; एकावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:12 PM2019-09-27T12:12:45+5:302019-09-27T12:13:46+5:30

नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव पसिरात शुक्रवारी पहाटे एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली. पंपावरील कर्मचा-याकडून रोख रक्कम, व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी एका वाहन चालकावर हल्ला करुन त्यास जखमी केले. चोरट्यांनी किती रोकड चोरुन नेली हे मात्र समजू शकले नाही. 

Petrol pump looted on Nagar-Aurangabad road; Armed attack on one | नगर-औरंगाबाद रोडवर पेट्रोल पंप लुटला; एकावर सशस्त्र हल्ला

नगर-औरंगाबाद रोडवर पेट्रोल पंप लुटला; एकावर सशस्त्र हल्ला

Next

घोडेगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव पसिरात शुक्रवारी पहाटे एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली. पंपावरील कर्मचा-याकडून रोख रक्कम, व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी एका वाहन चालकावर हल्ला करुन त्यास जखमी केले. चोरट्यांनी किती रोकड चोरुन नेली हे मात्र समजू शकले नाही. 
 नगर-औरंगाबाद मार्गावर घोडेगावपासून नगरकडे साधारण दोन किलोमीटर अंतरावर पागीरे यांचा मे मनिषा पेट्रोलियम हा पंप आहे. शुक्रवारी पहाटे नगरकडून मोटारसायकलवर दहा ते बारा जण आले. पँट, शर्ट घातलेल्या व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. तर हातात कोयते, कु-हाडी, तलवारी, गलोल अशी हत्यारे होती. पंपावरील कामगारांना हत्याराचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. व्यवस्थापक केबीनमध्ये नेऊन टेबलाच्या ड्रावरमधील रक्कम काढून घेतली. काहींचे मोबाईल हिसकावून घेतले. पंपावर काही ट्रक, टेम्पो, जीप ट्रेलर मुक्कामी थांबले होते. त्यातील काही गाड्यांच्या काचा फोडून चालकांना मारहाण करुन त्यांची रक्कम लुटली. दोन कामगार, एक वाहन चालकास मारहाण करण्यात आली. त्यातील वाहनचालकावर कोयत्याचा वार हातावर लागल्याने तो जखमी झाला आहे. जखमीस शनीशिंगणापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
 घटनास्थळी शेवगावचे  पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे, नेवासाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सोनईचे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे,श्वान पथक, ठसे तज्ञांचे पथक दाखल झाले. चोरटे येथील सीसीटिव्ही कॅमेºयात कैद झाले असले तरी त्यांची वाहने मात्र दिसत नाहीत. ऐन साखर झोपेत पंपावर लुट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
सुभाष कांबळे हा चालक पिकअप जीपसह पंपावर थांबला होता. त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्यास हत्याराचा धाक दाखवून त्याचे सहा हजार रुपये लुटले. परंतु कांबळे याने साहेब माझे सगळेच पैसे चालवले. मला टोलनाक्याला पैसे द्या. नाहीतर मी कसा जाणार? असा सवाल केला. मला टोलनाक्यासाठी दोनशे रुपये तरी द्या विनवणी केल्यावर त्याला चोरट्यांनी दोनशे रुपये देऊन माणुसकी जागविली. 

Web Title: Petrol pump looted on Nagar-Aurangabad road; Armed attack on one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.