मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:08 PM2016-04-25T23:08:31+5:302016-04-25T23:21:17+5:30

अहमदनगर : वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या शिवारात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी यातील आरोपी आत्माराम यशवंत वाघ याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते.

Police custody of accused in case of girl child abuse | मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

Next

अहमदनगर : वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या शिवारात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी यातील आरोपी आत्माराम यशवंत वाघ याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते. त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी दिले आहेत.
वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिर आश्रम परिसरात एका अल्पवयीन मुलीवर आत्माराम याने शुक्रवारी (दि. २२) अत्याचार केला होता. मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्यातील अत्याचारीत मुलीचे वय १५ वर्षे आहे, याची माहिती असूनही आरोपीने मुलीवर अत्याचार केला. आरोपीने आणखी कुठे नेऊन मुलीवर अत्याचार केला, आरोपीला आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश चौरे यांनी आरोपीला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी के. शेंगेपल्लू उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Police custody of accused in case of girl child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.