वीजप्रश्नी दंडुके मोर्चा, घेराव अन् निदर्शने

By admin | Published: May 30, 2014 01:12 AM2014-05-30T01:12:34+5:302014-05-30T01:16:42+5:30

पाथर्डी: भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी‘महावितरण’ कार्यालयावर दंडुके मोर्चा नेऊन निदर्शने केली

Power Probe Danduke Front, Gherao and Opposition | वीजप्रश्नी दंडुके मोर्चा, घेराव अन् निदर्शने

वीजप्रश्नी दंडुके मोर्चा, घेराव अन् निदर्शने

Next

 पाथर्डी: शहर व तालुक्यातील सायंकाळचे भारनियमन तसेच अचानक होणारे भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी गुरुवारी ‘महावितरण’ कार्यालयावर दंडुके मोर्चा नेऊन उपअभियंत्याला सुमारे दोन तास घेराव घालून कार्यालयासमोर निदर्शने केली. भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० कार्यकर्ते सकाळी दंडुके घेत मोर्चाने ‘महावितरण’ कार्यालयावर गेले. भारनियमनाव्यतिरिक्त अचानक विशेषत: रात्री होणार्‍या वाढीव भारनियमनामुळे चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. ‘महावितरण’ कार्यालयाचा दूरध्वनी अनेकदा बंद असतो, असे गर्जे यांनी निदर्शनास आणून दिले. काही महिन्यापूर्र्वी वीज वसुलीचे प्रमाण ३५ टक्के होते, परंतु आता ७५ टक्क्याच्यावर वसुली होऊनही अधिकार्‍यांच्या दुर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे भारनियमनात वाढ होत आहे. याचा निषेध करीत संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ‘महावितरण’ च्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी राठी यांना दूरध्वनीवरुन आंदोलनाची माहिती दिल्यानंतर त्यांनी भारनियमन बंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात गोल्डन ग्रूपचे अध्यक्ष मुकुंद गर्जे, व्यापारी सेलचे अध्यक्ष सोनू गुगळे, शहर सरचिटणीस परवेझ मनियार, राम पावटेकर, हरी अन्नदाते आदींसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Power Probe Danduke Front, Gherao and Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.