कोपर्डीसह परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 11:43 PM2016-07-20T23:43:00+5:302016-07-20T23:48:44+5:30

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भितीदायक वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़

Pre-life in the area, including Coppardi | कोपर्डीसह परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

कोपर्डीसह परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

Next

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भितीदायक वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़ कोपर्डीसह कुळधरण व कर्जत शहरातील शाळा सुरळीत सुरू झाल्या असून बुधवारी मुलींनीही शाळांत हजेरी लावली़
अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर कोपर्डीसह परिसरात दहशत निर्माण झाली होती़ भितीपोटी मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते तर मुलींच्या पालकांमध्येही भीती निर्माण झाली होती. मात्र, कोपर्डीसह परिसरात व्यवहार पूर्वपदावर येत असून, गावासह शेतातील कामेही सुरू झाली आहेत़ घटनेनंतर कोपर्डीतील ग्रामस्थांनीही समजदारपणाची भूमिका घेत गावात कुठलाही अनुचित प्रकार घडवू दिला नाही़
दरम्यान बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी कोपर्डी येथे भेट देऊन ग्रामस्थांसह शाळकरी मुलींना धीर दिला़ तसेच पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले़
(प्रतिनिधी)
वकीलपत्र घेणार नाही; वकील संघाचा निर्णय
कर्जत : कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय बुधवारी कर्जत तालुका वकील संघाच्या बैठकीत घेण्यात आला.
संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नवनाथ फौंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अ‍ॅड. धनराज राणे यांनी वकीलपत्र न घेण्याचा ठराव मांडला. त्याला अ‍ॅड. बापूराव चव्हाण यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, अ‍ॅड. संजीवन गायकवाड, अ‍ॅड. दीपक भोसले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. भीमराव शेळके, अ‍ॅड. राहुल जाधव, अ‍ॅड. शरदचंद्र कदम, अ‍ॅड. दहीवळकर उपस्थित होते.

Web Title: Pre-life in the area, including Coppardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.