ग्रामसभेत शासकीय योजनांचे वाचन

By admin | Published: April 24, 2016 11:04 PM2016-04-24T23:04:58+5:302016-04-24T23:13:54+5:30

अहमदनगर : शासनाच्या अनेक योजना आहेत़ पण, त्यांची माहिती मिळत नाही़ त्यामुळे अनेकजण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.

Reading of government schemes in Gram Sabha | ग्रामसभेत शासकीय योजनांचे वाचन

ग्रामसभेत शासकीय योजनांचे वाचन

Next

अहमदनगर : शासनाच्या अनेक योजना आहेत़ पण, त्यांची माहिती मिळत नाही़ त्यामुळे अनेकजण शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र, सरकारी योजनांची माहिती गावातच उपलब्ध करून देण्यात आली असून, पंचायत राज दिनानिमित्त रविवारी (दि.२४) जिल्ह्यातील ४८७ गावांत योजनांचे वाचन करण्यात आले आहे.
शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी सरकारकडून ‘ग्राम उदय से भारत उदय’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ उपक्रमांतर्गत गावात जावून शासकीय योजनांची माहिती दिली जाते़ या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही २१ ते २४ एप्रिल, या काळात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत जनधन योजना, अटल पेन्शन योजना, मागेल त्याला शेततळे यांसारख्या विविध विभागाच्या योजनांचे वाचन गावातीलच ग्रामसेवकाकडून करण्यात आले़ त्यात रविवारी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ४८७ गावांत ग्रामसभा घेण्यात आल्या़ या सभेत शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली़ यापूर्वी तीन दिवसांत ८१० ग्रामसभांचे आयोजन करून योजनांची माहिती देण्यात आली असून, संगमनेर तालुक्यातील तीन गावांतील ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या आहेत.स्थगित केलेल्या ग्रामसभा येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा घेण्यात येतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़
ग्रामस्थांना गावातच योजनेची माहिती मिळावी, तसेच त्यासाठी काय अटी आहेत, याची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ ग्रामसभा घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली़ त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एका निरीक्षकांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती़ ग्रामपंचायतीसाठी एक निरीक्षक कार्यरत होता़
गावातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन किसान सभा व ग्रामसभांचे आयोजन करण्याचा कालावधी सरकारने निश्चित केला होता़ त्यानुसार हा उपक्रम गावागावात राबविण्यात आला असून, त्यातून लोकांना योजनेची माहिती देण्यात आली़
(प्रतिनिधी)
ग्राम उदय से भारत उदय अंतर्गत जिल्ह्यात रविवारी ४८७ गावांत ग्रामसभा घेण्यात आल्या़ त्यापूर्वी ८१० ग्रामसभा झाल्या़ त्यात योजनांची माहिती देण्यात आली़ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकण्यासाठी प्रत्येक गावात दूरदर्शन संच व रेडिओची व्यवस्था करण्यात आली होती़ अखेरच्या दिवशी रविवारी पंचायत राज दिनही साजरा करण्यात आला़
- प्रशांत शिर्के, जिल्हा समन्वयक, तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Reading of government schemes in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.