चेक पोस्टवर ड्युटी करण्यास नकार; शिक्षकास बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:49 PM2020-05-03T16:49:04+5:302020-05-03T16:49:53+5:30
कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी रविवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
श्रीगोंदा : कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी रविवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शरद राऊत इतर काही शिक्षकांना चेक पोस्ट ड्युटी लावली. यामध्ये शरद राऊत यांना निमगाव खलू येथील चेक पोस्टवर ड्युटी लावण्यात आली होती. राऊत यांनी ड्युटी करण्यास नकार दिला. मी चेक पोस्टवर काम करणार नाही, असे तहसीलदार यांना मोबाईलवर सांगताना अरेरावीची भाषा केली. त्यानंतर तहसीलदार महेंद्र महाजन यांनी शरद राऊत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठ दिवसात आपले लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सुमारे एक हजार प्राथमिक ५०० माध्यमिक शिक्षक आहेत. हे शिक्षक घरी आहेत. कोरोना प्रतिबंधक मोहिमेत आरोग्य महसूल व पोलिसांवर ताण आला आहे.
कोरोना मोहिमेत शिक्षकांवर मोठी जबाबदारी
कोरोना ग्रामसुरक्षा समिती व संचारबंदीचे पालन होते की नाही. कुंटुबांतील सदस्य माक्स वापरतात का? सॅनिटरीझिंग व हॅण्डवॉश चा वापर करतात का? बाहेर गावावरून नागरिक होमक्वारंटाईन आहेत का? शाळा क्वारंटाईनमधील नागरिक शाळेत राहतात का? याचा होम टु होम सर्व्हे करण्याची जबाबदारी त्या गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. हे काम मंगळवारपासून होणार आहे. या कामातून महिला शिक्षकांना वगळण्यात येणार आहे, अशी माहिती समजली आहे.