इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

By सचिन धर्मापुरीकर | Published: December 16, 2023 05:00 PM2023-12-16T17:00:36+5:302023-12-16T17:01:08+5:30

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा.

Restrictions on ethanol production back in ahmednagar | इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव : थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामीण अर्थकारणास इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे. चालू वर्षी उसाचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली होती, ती साखर उद्योगास मारक असून देशात सुमारे ३५५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली. राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली, गेल्या वर्षी १२० कोटी लीटर इथेनॉल ऑइल कंपन्यांना पुरवले गेले, चालू वर्षी ३०० कोटी लीटर्सपर्यंत वाढ झाली त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन वाढेल तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मागणी लावून धरली होती, त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुनर्विचार केला. हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम गेल्या ५ वर्षांपासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे.

निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा :

बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगात आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात धडाडीचे पावले उचलली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार करून त्याबाबत ठोस निर्णय घेतला त्याबद्दल युवानेते, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही केंद्र शासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

Web Title: Restrictions on ethanol production back in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.