मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

By admin | Published: July 14, 2016 01:21 AM2016-07-14T01:21:58+5:302016-07-14T01:27:32+5:30

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे़

Road to Himalaya Dam | मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

Next

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे़ २६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात बुधवारी दुपारी १२ हजार ७३ दशलक्ष घनफुटाच्यावर पाणीसाठा झालेला होता़
गेल्या सात दिवसात मुळा धरणावर आज (बुधवारी) प्रथमच सूर्यदर्शन झाले़ सकाळी सहा वाजता धरणात ११ हजार ६७४ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली होती़ तर रात्री ९ वाजता धरणातील पाणीसाठा १२ हजार २१४ दशलक्ष घनफूट झाला होता. नवीन पाण्याची आवक सकाळी १० हजार ३५४ क्युसेकने सुरू होती़ सकाळी ९ वाजता साठा ११ हजार ९१५ दशलक्ष घनफुटावर गेला़ पावसाने उसंत घेतल्याने सायंकाळी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५ हजार ५१४ क्युसेकवर घसरली़ बुधवारी सकाळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली़ दुपारी पावसाने विश्रांती घेतली होती़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली असली तरी लाभक्षेत्रावर मात्र समाधानकारक पाऊस नाही़ खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे़

Web Title: Road to Himalaya Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.