संध्या, भावना, मधू ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

By admin | Published: April 23, 2016 01:06 AM2016-04-23T01:06:15+5:302016-04-23T01:06:55+5:30

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कोहिनूर वस्त्रदालन आयोजित सखी महोत्सव’ यामध्ये संध्या पावसे या फॅन्सी क्वीन, भावना केदार या ब्रायडल क्वीन तर मधू बोरा या मँगो क्वीन ठरल्या.

Sandhya, Bhavana, Madhu, Shankar, First Ranked Officer | संध्या, भावना, मधू ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

संध्या, भावना, मधू ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

Next

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कोहिनूर वस्त्रदालन आयोजित सखी महोत्सव’ यामध्ये संध्या पावसे या फॅन्सी क्वीन, भावना केदार या ब्रायडल क्वीन तर मधू बोरा या मँगो क्वीन ठरल्या.
उर्वरित निकाल - फॅन्सी क्वीन- द्वितीय- शिल्पा मुथ्था, तृतीय- पल्लवी शिंगी.
ब्रायडल क्वीन- द्वितीय- वर्षा पितळे, तृतीय- सारिका परदेशी.
मँगो क्वीन- द्वितीय- सविता रहाडे, तृतीय- ज्योती केतकर यांनी बक्षिसे मिळविली.
तसेच यावेळी ज्युनि. अमिताभ यांनी सखींचे मनोरंजन केले. ‘कौन बनेगा करोडपती’, फनी गेम्स, प्रश्नोत्तरे यामधून शिल्पा भंडारी, शीतल चौधरी, ज्योती बोरा, सीमा गुगळे, कल्पना जाधव या सखींनी बक्षिसे मिळविली.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी राखी मुनोत, मंदा पोळ या उपस्थित होत्या. या महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांमध्ये सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. फॅन्सी क्वीन या स्पर्धेत रेखा, श्रीदेवी, जया प्रदा, जया भादुरी, हेमा मालिनी, झिनत अमान, मुमताज अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची वेशभूषा सखी स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सादर केली. तर मँगो क्वीनमध्ये कैरीचे सरबत, पन्हे, कैरीची डाळ, लोणचे, पुलाव, चटणी असे अनेक पदार्थ सखींनी करून दाखविले होते तर ब्रायडल क्वीन मध्येही महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती अशा नववधू सखी स्पर्धकांनी सुंदररित्या सजविल्या होत्या. सर्व स्पर्धांचे परीक्षण नंदा सोमाणी, आदिती सिन्हा, विद्या बडवे यांनी केले.
सोबतच ज्युनि. अमिताभ यांनी सखींना बागबान, दिवार, नमक-हलाल, सूर्यवंशम्, हम, जंजीर, शोले, डॉन, शराबी, मोहब्बते अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातील डायलॉग्ज, गाणे सादर करून सखींची वाहवा मिळविली. अगदी हुबेहूब अमिताभ बच्चन यांचा आवाज काढून सखींना मनमुराद हसविले. सखींनीही विविध गीतांवर ठेका धरला.
विजेत्या सखींना प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस यांच्यातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण अ‍ॅड.वृषाली तांदळे, ज्युनि. अमिताभ, नंदा सोमाणी, आदिती सिन्हा, विद्या बडवे यांच्या हस्ते झाले.
प्रीती संचेती, भारती गुंदेचा, प्राजक्ता रासने, अलका मुंदडा, शिल्पा भंडारी, बबिता गांधी, गुंजन भंडारी यांनी सहकार्य केले. या महोत्सवात आशा भोसले, सविता रहाडे, डॉ.रश्मी आरडे, माधुरी हारदे, कल्पना कडव या पाच सखींना गायनाची संधी देण्यात आली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Sandhya, Bhavana, Madhu, Shankar, First Ranked Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.