सराफांचा पुन्हा आजपासून संप

By admin | Published: April 24, 2016 10:54 PM2016-04-24T22:54:46+5:302016-04-24T23:11:15+5:30

अहमदनगर : केंद्र सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता.

Sarafa's refill from today | सराफांचा पुन्हा आजपासून संप

सराफांचा पुन्हा आजपासून संप

Next

अहमदनगर : केंद्र सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतेही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी शनिवारी नगर येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले़ फेडरेशनचे सचिव सुधाकर टाक, प्रेम धावड, उपाध्यक्ष सचिन आंबिलवादे, खजिनदार, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गणेश बेद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी रांका म्हणाले, १ मार्चपासून पुकारलेल्या संपाला संपूर्ण देशातील सराफ व्यावसायिकांनी एकजूट दाखवून मोठा पाठिंबा दिला. १० दिवसांकरीता तात्पुरता हा संप स्थगित करण्यात आला होता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे द्वितीय सत्र २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. या बजेट सत्रात चर्चा होणार असून सर्व विरोधी पक्षाचे खासदार, शिवसेनेचे २१ खासदार व भाजपामधीलही काही खासदार चर्चेदरम्यान या अबकारी करास तीव्र विरोध करणार आहेत. त्यामुळे सरकारने लादलेल्या हा अबकारी कर मागे घ्यावाच लागणार आहे. या अबकारी कराच्या निषेधार्थ पुन्हा सराफ सुवर्णकार व्यावसायिक २५,२६,२७ एप्रिल दरम्यान तीन दिवसांचा राष्ट्रीय संप पाळणार आहेत. तसेच सराफ सुवर्णकार व्यावसायिकांची ताकद दाखविण्याकरिता २५ एप्रिल रोजी संसदेवर सराफ सुवर्णकारांचा महामोर्चा धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले़ या तीन दिवसीय संपात नगरमधील सराफही सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Sarafa's refill from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.