कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी

By admin | Published: July 24, 2016 11:50 PM2016-07-24T23:50:41+5:302016-07-25T00:08:19+5:30

कोपर्डी : कोपर्डी येथील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची सोय होईल, अशी मागणी गावकऱ्यांनी रविवारी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली.

Secondary education in Kopardid should be available | कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी

कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी

Next

कोपर्डी : कोपर्डी येथील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची सोय होईल, अशी मागणी गावकऱ्यांनी रविवारी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली. कोपर्डीच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.
पाटील यांनी अत्याचारीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घटना अत्यंत दुर्दैवी असून हा प्रकार पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर मुलींच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आपण सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. कोपर्डीतील मुलांना सातवीनंतर शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातच ही सुविधा हवी आहे, याकडे गावातील लालासाहेब सुद्रीक, झुंबर सुद्रीक व गौतम सुद्रीक यांनी त्यांचे लक्ष वेधले. यासंदर्भात गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले.
कुठल्याही गुन्हेगाराला जात-धर्म नसतो. त्यामुळे अशा घटनांप्रसंगी सर्व समाजाने एकत्र राहून गुन्हेगारांना शासन होण्याची मागणी करायला हवी. एकमेकांची मने कलुषित न करता सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत लोकभारतीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. आदिनाथ शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राचार्या वर्षाताई निकम, हमाल पंचायतचे नेते अविनाश घुले, बाबा अरगडे, अंनिसच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे, पॉल भिंगारदिवे, अ‍ॅड. जॉन खरात, राजा कांदळकर, नवनाथ गेंड, दिनेश खोसे, फैय्याज इनामदार, प्रफुल्ल ओव्हळ उपस्थित होते.

Web Title: Secondary education in Kopardid should be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.