सखींसाठी श्रावण सोहळा आज

By Admin | Published: August 31, 2016 12:19 AM2016-08-31T00:19:44+5:302016-08-31T00:29:21+5:30

अहमदनगर : श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा आवडीचा, तसेच कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून तर माहेरवासियांच्या

Shravan Funeral for the Sakhi Today | सखींसाठी श्रावण सोहळा आज

सखींसाठी श्रावण सोहळा आज

googlenewsNext


अहमदनगर : श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा आवडीचा, तसेच कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून तर माहेरवासियांच्या मनात कायम पिंगा घालणारा हा महिना उत्साह आणि पावित्र्याचा सुरेख मेळ घडवून आणणारा आहे.
मंगळागौर, गौरी, गणपती, श्रावणी सोमवार, नागपंचमी आदी सणांची तयारी घराघरात मांगल्य घेऊन येते, अशातच या उत्साहाला उधाण आणण्यासाठी खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. ३१ आॅगस्ट २०१६ रोजी नंदनवन लॉन्स, टिळक रोड, अ.नगर येथे दुपारी २ वाजता केले आहे.
या कार्यक्रमाकरिता श्री साईबाबा एजन्सीज् डिस्ट्रीब्युटर धारा कुकिंग आॅईल, मार्केटयार्ड, अ.नगर हे गिफ्ट प्रायोजक आहेत. वैशिष्ट्यपूर्ण उद्देश असलेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यात सखींसाठी १) उखाणा स्पर्धा २) फॅशन शो ३) रांगोळी ४) मेहंदी ५) पूजा थाळी सजावट अशा स्पर्धा होणार आहेत. या श्रावण सोहळ्याला उपस्थित महिलांना विशेष भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
(प्रतिनिधी)

Web Title: Shravan Funeral for the Sakhi Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.