श्रीगोंद्याला मिळणार कमी पाणी

By admin | Published: April 24, 2016 10:59 PM2016-04-24T22:59:30+5:302016-04-24T23:18:36+5:30

श्रीगोंदा : कुकडी कालवा दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे़ त्यामुळे सोमवारपासून कुकडीचे आवर्तन टेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़

Shrigonda will get less water | श्रीगोंद्याला मिळणार कमी पाणी

श्रीगोंद्याला मिळणार कमी पाणी

Next

श्रीगोंदा : कुकडी कालवा दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे़ त्यामुळे सोमवारपासून कुकडीचे आवर्तन टेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील पाणी कमी करण्यात येणार असून, श्रीगोंदा येथील तलाव भरणेही पाच दिवस लांबणीवर पडणार आहे़
आमदार राहुल जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जि़ प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी रविवारी विसापूर तलावातील जलसाठ्याची पाहणी केली़ टंचाई आराखड्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या़ आमदार जगताप म्हणाले, जादा तलावात पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेत कार्यवाही सुरू झाली आहे़
श्रीगोंदा शहरालगत असलेल्या लेंडीनाल्यात कुकडीचे पाणी आल्याने शहरातील कूपनलिका आठवडाभरात चालु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्यामुळे पाण्याच्या विवंचनेतून शहरवासियांचा जीव भांड्यात पडला आहे़
२३७ रोहित्रांची वीज तोडणार
कुकडीच्या पाण्याने भरलेले तलाव मुख्य कालवा परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या अंतरातील रोहित्रांचा वीज पुरवठा तोडण्यात येणार आहे़ यामध्ये सुमारे २३७ रोहित्रांचा समावेश आहे़
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही़ त्यामुळे कुकडी कालव्यावरील बेकायदा पाईपलाईन टाकणाऱ्यावर जलसंपदा विभागाने ठोस कारवाई करणे महत्वाचे आहे़
-अनिल कवडे, जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
वडाळी शिवारात कुकडी कालवा फोडून काही बड्या नेत्यांनी थेट कालव्यातून पाईपलाईन केल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी,ख तहसीलदार वंदना खरमाळे यांना दिले़ कुकडी कालवा फोडून बेकायदेशीर पाईपलाईन टाकल्याप्रकरणी जलसंपदा विभागाने यापूर्वीच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे़
पारगाव सुद्रीक येथील तलाव भरला
पारगावचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराजांच्या यात्रौत्सवात भाविकांच्या पाण्याची सोय होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने केलेल्या ठरावाची दखल घेत प्रशासनाने पारगावचा तलाव भरला आहे़

Web Title: Shrigonda will get less water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.