कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायी मुक्तता, पोलिस पाहताच वाहनचालकासह दोघे फरार

By सचिन धर्मापुरीकर | Published: October 28, 2023 02:22 PM2023-10-28T14:22:56+5:302023-10-28T14:23:36+5:30

...मात्र वाहनचालक व अन्यएकजण पोलिसांना पाहताच फरार झाले.

Six cows being taken for slaughter were freed, two absconded with the driver on seeing the police | कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायी मुक्तता, पोलिस पाहताच वाहनचालकासह दोघे फरार

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायी मुक्तता, पोलिस पाहताच वाहनचालकासह दोघे फरार

अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री टेम्पोमधून सहा गायींची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. मात्र वाहनचालक व अन्यएकजण पोलिसांना पाहताच फरार झाले. 

घटनेबाबात अधिक माहिती अशी की, एमएच १५ सीके ३६६७ या टेम्पोमधून कत्तलीसाठी गायी नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी नगर-मनमाड रस्त्यावरील पूणतांबा चौफूली येथे रात्री साडेबारा वाजता पाठलाग करून टेम्पो अडविला. परंतू वाहनचालक व अन्य एकजण टेम्पो सोडून फरार झाले. टेम्पोमध्ये सहा जर्सी गायी होत्या. कत्तलीपासून गायींची मुक्तता झाली आहे. 

याप्रकरणी सहा गायी व टेम्पो असा एकूण दोन लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुशील शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पोचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पो.हे.कॉ. आर. पी. पुंड करीत आहेत.
 

Web Title: Six cows being taken for slaughter were freed, two absconded with the driver on seeing the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.