घरकुलांच्या खरेदीखताचे मुद्रांक शुल्क माफ करा

By admin | Published: August 8, 2016 12:05 AM2016-08-08T00:05:54+5:302016-08-08T00:10:34+5:30

अहमदनगर : केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांच्या खरेदीखताचे मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबतची मागणी

For the stamp duty of the purchasing house, forgive the stamp duty | घरकुलांच्या खरेदीखताचे मुद्रांक शुल्क माफ करा

घरकुलांच्या खरेदीखताचे मुद्रांक शुल्क माफ करा

Next

अहमदनगर : केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांच्या खरेदीखताचे मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबतची मागणी खासदार दिलीप गांधी आणि उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
खासदार गांधी आणि छिंदम यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेवून निवेदन दिले. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, महेश तवले, बाळासाहेब पोटघन, कुमार दळवी, संग्राम म्हस्के उपस्थित होते. घरकूल योजनेतील लाभार्थी गरीब आणि मजुरी करणारे आहेत. मुद्रांक शुल्काचा खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे घरकूल योजनेतील मुद्रांक शुल्क माफ करावा. नगर येथील वारुळाचा मारुती, नालेगाव परिसरात ३७२ घरांची योजना राबविलेली आहे. काटवन खंडोबा मंदिराजवळ ही योजना पूर्ण झालेली आहे. घराचा ताबा मिळावा, यासाठी लाभार्थी पाठपुरावा करीत आहेत. खरेदीखत झाल्याशिवाय ताबा देणे शक्य नाही. खरेदीसाठी त्यांच्याकडे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ही रक्कम शासनाने माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली़

Web Title: For the stamp duty of the purchasing house, forgive the stamp duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.