अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम सुरू

By admin | Published: August 12, 2016 11:54 PM2016-08-12T23:54:19+5:302016-08-12T23:56:36+5:30

अहमदनगर : बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतरित्या टाकलेले अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. तांत्रिकपद्धतीने प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

Starting the work of Animal West | अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम सुरू

अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम सुरू

Next

अहमदनगर : बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतरित्या टाकलेले अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. तांत्रिकपद्धतीने प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू झाले.
पुणे येथील हरित न्यायाधिकरणाने (लवाद) दिलेल्या आदेशान्वये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. एन. एस. पैठणकर, आर.जी. मेहेत्रे, आर. जी. सातपुते यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कचरा डेपोच्या जागेत अनेक वर्षांपासूनचा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. काही कचरा कुजला आहे, तर काही कचरा जळून गेला होता. या कचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक होते. मात्र कोणताही प्रक्रिया न करता तो तसाच पडून होता. खड्डे खोदून त्यामध्ये कचरा टाकणे, मातीत मिसळणे आणि त्याला भुसभुशीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनाधिकृत कत्तलखाने मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचे अवशेष आणून टाकत आहेत. ते अवशेष मातीत गाडून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी औषधांचाही वापर करण्यात आला आहे. तसेच डेपो परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसात कचरा उचलण्याचे काम सुरू राहणार आहे. सावेडी कचरा डेपोतही याचपद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू झाले.
दरम्यान कोणीही अ‍ॅनिमल वेस्ट कचरा डेपोत टाकणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासाठी डेपोच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिली. तसेच डेपोमध्ये रात्रपाळीसाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Starting the work of Animal West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.